२५ हजार शौचालय अपूर्णच
By Admin | Updated: October 29, 2016 01:41 IST2016-10-29T01:41:35+5:302016-10-29T01:41:35+5:30
स्वच्छत भारत मिशन (ग्रामीण) अभियानांतर्गत जिल्हा परिषद गडचिरोलीच्या वतीने सन २०१६-१७ या चालू वर्षात

२५ हजार शौचालय अपूर्णच
आर्थिक वर्ष संपायला चार महिने उरले : बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे प्रशासनापुढे आव्हान
गडचिरोेली : स्वच्छत भारत मिशन (ग्रामीण) अभियानांतर्गत जिल्हा परिषद गडचिरोलीच्या वतीने सन २०१६-१७ या चालू वर्षात ११ तालुक्यात एकूण ३४ हजार २४९ शौचालय मंजूर करण्यात आले. यापैैकी ९ हजार शौचालयाचे बांधकाम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. तब्बल २५ हजार २४९ शौचालय अद्यापही अपूर्ण स्थितीत आहे. ३१ डिसेंबर अखेरपर्यंत अपूर्ण शौचालयाचे काम पूर्ण करून १०० टक्के उद्दिष्ट गाठण्याचे प्रशासनापुढे मोठे आव्हान आहे.
डिसेंबरपासून कामात गती येणार
गडचिरोली जिल्ह्यात धान हे मुख्य पीक घेतल जाते. खरीप हंगामात धानपिकाची मोठ्या प्रमाणात लावगड करण्यात आली असून संपूर्ण पावसाळाभर शेतीची कामे करण्यात आली. त्यामुळे या कालावधीत शौचालयाचे काम सर्वच गावात ठप्प पडले. मात्र आता पावसाळा संपला असून धानपिकाच्या कापणी व बांधणीचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यापासून वैयक्तिक शौचालयाच्या कामात गती येणार आहे. त्या दिशेने प्रशासनाकडूनही प्रयत्न होणार आहेत.
अहेरी उपविभाग पिछाडीवर
अहेरी, भामरागड, एटापल्ली, कुरखेडा, मुलचेरा, सिरोंचा या सहा तालुक्यांचा समावेश असलेल्या अहेरी उपविभागात वैयक्तिक शौचालयाच्या कामाची गती प्रचंड मंदावली आहे. या पाचही तालुक्याच्या ग्रामपंचायतीअंतर्गत गावांमध्ये मोठ्या प्रमाणात शौचालय अपूर्ण स्थितीत आहेत. त्या तुलनेत गडचिरोली, चामोर्शी, आरमोरी, गडचिरोेली या तालुक्यात शौचालयाच्या कामात समाधानकारक गती आहे. विविध शासकीय योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या विकास कामात अहेरी उपविभागातील बहुतांश गावे पिछाडीवर राहत असल्याचे दिसून येते.