शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

२५ हजार आजी-आजोबा साक्षरतेच्या परीक्षेत उत्तीर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2024 4:41 PM

Gadchiroli : शिक्षण विभागामार्फत साक्षरतेचे प्रमाणपत्र देऊन केला जाणार गौरव

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : नवभारत साक्षता अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील ३३ हजार ७८७ निरक्षरांनी परीक्षा दिली होती. त्यात बहुतांश वयस्क नागरिकांचा समावेश होता. त्यातील २४ हजार ६४४ जण परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. 

शिक्षण विभाग (योजना) अंतर्गत त्यांना लवकरच साक्षर झाल्याचे प्रमाणपत्र वितरित केले जाणार आहे. निरक्षरता हा व्यक्तीच्या विकासातील सर्वांत मोठा अडथळा आहे. अशा व्यक्तीला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. प्रत्येक व्यक्ती जास्त शिकला नसला तरी किमान त्याला अक्षर ओळख असावी, यासाठी केंद्र शासनामार्फत प्रयत्न केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणजे केंद्र शासनाने नवभारत साक्षर अभियान सुरू केले आहे. याअंतर्गत सर्वप्रथम निरक्षर नागरिकांचा जिल्हा परिषद शिक्षकांमार्फत शोध घेण्यात आला. जिल्ह्यात ६१ हजार ९२८ नागरिक निरक्षर आढळून आले. गावातील काही व्यक्ती स्वयंसेवक म्हणून काम करीत या निरक्षर नागरिकांना शिकवले. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात परीक्षा घेण्यात आली. ३३ हजार ७८७ नागरिकांनी परीक्षा दिली. त्यापैकी २४ हजार ६४४ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर ९ हजार १४३ परीक्षार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. त्यांची सप्टेंबर महिन्यात पुन्हा परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षा देणाऱ्या काही नागरिकांनी तर वयाची ७५ वर्षे पार केले होते.

९ हजार १४३ जणांना सुधारणेची गरजपरीक्षा दिलेल्यांपैकी ९ हजार १४३ जणांनी आवश्यक तेवढे गुण मिळवू शकले नाही. त्यांना 'सुधारणेची गरज असा शेरा देण्यात आला आहे. त्यांना शिकवण्याचे काम अजूनही सुरूच आहे. त्यांची सप्टेंबर महिन्यात परीक्षा घेतली जाणार आहे. यावेळेस उत्तीर्ण झाल्यास त्यांना साक्षरतेचे प्रमाणपत्र देऊन गौरवले जाईल.

शिकण्याला वयाचे बंधन नसतेचव्यक्ती लहान असल्यापासून तर मरणाच्या शेवटच्या श्वासापर्यंत काही तरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करीत असते. त्यासाठी केवळ संधी उपलब्ध होणे आवश्यक आहे. हीच बाब नवसाक्षरतेची परीक्षा देणाऱ्यांबाबत घडला आहे. हाताला लकवा मारला असतानाही त्यांनी बाराखडी शिकली. एवढेच नाही, तर परीक्षा उत्तीर्ण केली. म्हणजेच शिकण्याला वयाचे बंधन नाही हे सिद्ध करून दाखवले आहे.

जे नागरिक उत्तीर्ण झाले त्यांना शासनाच्या आदेशानुसार साक्षरतेचे प्रमाणपत्र देऊन गौरवले जाईल. जे नागरिकांना सुधारणेची गरजआहे, असा शेरा दिला आहे. त्यांची सप्टेंबर महिन्यात परीक्षा घेतली जाईल. सर्वेक्षणात निरक्षर आढळलेल्यांपेकी ज्यांनी परीक्षा दिली नाही त्यांना पुन्हा शिकवून त्यांना परीक्षा देण्यास प्रोत्साहित केले जाईल.- वैभव बारेकर, शिक्षणाधिकारी (योजना) 

टॅग्स :Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रGadchiroliगडचिरोली