छत्तीसगडमधून जिल्ह्यात आलेली २५ लाख रूपयांची दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 01:35 AM2019-01-09T01:35:11+5:302019-01-09T01:36:10+5:30

दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात काही दारू तस्करांकडून मोठ्या प्रमाणात दारूचा पुरवठा सुरूच असल्याची बाब कुरखेडाच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत उघडकीस आली. या कारवाईत एका ४०७ मालवाहू वाहनातून आलेली दारू पोलिसांनी पकडली.

25 lakh rupees liquor seized in Chhattisgarh | छत्तीसगडमधून जिल्ह्यात आलेली २५ लाख रूपयांची दारू जप्त

छत्तीसगडमधून जिल्ह्यात आलेली २५ लाख रूपयांची दारू जप्त

Next
ठळक मुद्देकुरखेडा एसडीपीओंची कारवाई : मालवाहू वाहनातून सुरू होता पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात काही दारू तस्करांकडून मोठ्या प्रमाणात दारूचा पुरवठा सुरूच असल्याची बाब कुरखेडाच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत उघडकीस आली. या कारवाईत एका ४०७ मालवाहू वाहनातून आलेली दारू पोलिसांनी पकडली. त्यातील तब्बल २५ लाख रुपयांच्या विदेशी दारूच्या पेट्या जप्त करण्यात आल्या.
ही कारवाई डोंगरगाव येथे रविवारी (दि.६) करण्यात आली. परंतू दोन दिवस या कारवाईचा मागमूसही कोणाला लागला नाही. एरवी थोडी दारू पकडली तरी माहिती देणाºया पोलिसांनी एवढी मोठी दारू पकडूनही त्याचा गवगवा का केला नाही? यामागील रहस्य काय? अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.
‘लोकमत’ने यासंदर्भात विचारणा केल्यानंतर कुरखेडाचे एसडीपीओ शैलेश काळे यांनी सांगितले की, एका मालवाहू वाहनातून छत्तीसगडकडून मोठ्या प्रमाणात दारूची आयात केली जात असल्याची गुप्त माहिती त्यांना मिळाली होती. त्यानुसार पुराडा या गावाजवळ नाकेबंदी करण्यात आली. परंतू नाकेबंदीची माहिती दारूच्या पेट्या आणणाºया त्या वाहनचालकापर्यंत पोहोचली. त्यामुळे त्याने आपले वाहन देऊळगावकडे वळविले. त्याच्या दुर्दैवाने त्याच वेळी वाहनाचे एक चाक पंक्चर झाले. अशा स्थितीत वाहनाचालक आणि त्याचे सहकारी वाहन तिथेच सोडून पळून गेले.
दरम्यान नाकेबंदी लावून बसलेल्या एसडीपीओंच्या पथकाला याची माहिती मिळताच त्यांनी देऊळगावकडे मोर्चा वळविला आणि त्या वाहनाची तपासणी केली. त्यात तब्बल २४ लाख ९५ हजार रुपयांच्या विदेशी दारूच्या पेट्या आढळल्या. त्या पेट्यांसह ७ लाखांचे वाहन असा एकूण ३२ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. दरम्यान पंचर वाहनात दारूच्या पेट्या असल्याची माहिती मिळाल्यानंतर गावातील काही नागरिकांनीही त्यातील काही दारू लांबवल्याचे सांगितले जाते.
‘ते’ वाहन कोणाच्ंो?
ज्या मालवाहू वाहनातून ही दारू येत होती त्या वाहनाचा क्रमांक एमएच ४९, डीएस ३३५५ असा होता. त्यावरून पोलिसांनी ते वाहन कोणाचे हे शोधण्याचा प्रयत्न केला असता तो नंबरच अस्तित्वात नसल्याचे दाखविले. त्यामुळे संबंधिताने डुप्लिकेट नंबरप्लेट बसविल्याचे दिसून आले. त्यामुळे वाहनाच्या चेसिस नंबरवरून वाहन मालकाचा शोध घेणे सुरू आहे.
कुरखेडा, गडचिरोली आणि चामोर्शीत पुरवठा
छत्तीसगडमधून आलेली ही दारू कुख्यात दारू तस्कर निर्मल धमगाये याची असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. विशेष म्हणजे ती कुरखेडा, गडचिरोली आणि चामोर्शी तालुक्यातील तीन दारू विक्रेत्यांकडे पोहचविली जात होती. यापूर्वीही त्यांच्याकडे अशाच पद्धतीने दारू पोहोचत होती. धमगाये या दारू तस्करावर यापूर्वी दारूबंदी कायद्यान्वये अनेक गुन्हे दाखल आहेत. मात्र त्याचे धंदे थांबलेले नाहीत. त्याच्यावर कडक कारवाई करून पोलीस त्याच्या कारवायांना पूर्णपणे आळा घालणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एक्साईज व एलसीबीसमोर आव्हान
मद्यविक्री सुरू असलेल्या जिल्ह्यातून किंवा लगतच्या छत्तीसगड, तेलंगणातून येणाºया अवैध दारूला रोखण्याचे आव्हान राज्य उत्पादन शुल्क विभाग (एक्साईज) आणि स्थानिक गुन्हे शाखेसमोर (एलसीबी) उभे ठाकले आहे. एक्साईज विभागाला अनेक दिवसानंतर नवीन अधीक्षक मिळाल्या आहे. आतातरी हा विभाग कारवाई करून दारू तस्करीला आळा घालणार का? असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत.

Web Title: 25 lakh rupees liquor seized in Chhattisgarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.