शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

२३० शाळाबाह्य विद्यार्थ्यांना केले शाळेत दाखल

By admin | Updated: February 3, 2016 01:40 IST

१५ ते ३१ जानेवारी दरम्यान शिक्षण विभागाने एनएसएसचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था यांच्या मार्फतीने शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोधमोहीम राबविली होती.

गडचिरोली : १५ ते ३१ जानेवारी दरम्यान शिक्षण विभागाने एनएसएसचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था यांच्या मार्फतीने शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोधमोहीम राबविली होती. या शोधमोहिमेदरम्यान २३० विद्यार्थी शाळाबाह्य असल्याचे आढळून आले असून या सर्वच विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना आणखी शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे. शिक्षणहक्क कायद्यानुसार ६ ते १४ या वयोगटातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क प्राप्त झाला आहे. या कायद्यानुसार देशातील एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये यासाठी शासन व प्रशासनाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. मागील वर्षीही शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोधमोहीम राबविण्यात आली होती. मात्र या शोधमोहीमेवर आक्षेप घेऊन आणखी काही विद्यार्थी शाळाबाह्य आहेत, असा आक्षेप घेण्यात आला होता. त्यामुळे शिक्षण विभागाने संपूर्ण राज्यात १५ ते ३१ जानेवारी दरम्यान शिक्षण विभागाचे कर्मचारी, वरिष्ठ महाविद्यालयांच्या एनएसएसचे विद्यार्थी व स्वयंसेवी संस्थांच्या मार्फतीने शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोधमोहीम राबविली होती. ही मोहीम गडचिरोली जिल्ह्यातही राबविली गेली. या मोहिमेदरम्यान सुमारे २३० विद्यार्थी शाळाबाह्य असल्याचे आढळून आले आहे. यामध्ये चार विद्यार्थी कधीही शाळेत गेले नव्हते. १८० विद्यार्थी मागील एक महिन्यापासून शाळेत येत नव्हते. तर ४६ विद्यार्थी स्थलांतर करून आपल्या पाल्यांसोबत आले असल्याचे पाहणीदरम्यान आढळून आले. या सर्वच विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत दाखल करण्यात आले आहे. एटापल्ली, भामरागड, कोरची, कुरखेडा, अहेरी हे तालुके आदिवासी बहूल व मागासलेले आहेत. या तालुक्यांमध्ये शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक असल्याचे या पाहणीदरम्यान दिसून आले आहे. (नगर प्रतिनिधी)