शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

२२ गावांनी घेतला दारूबंदीचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 01:22 IST

तालुक्यातील उडेरा, बुर्गी, येमली, तुमरगुंडा तोडसा, शेवारी, मानेवाडा आणि गुरुपल्ली ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या २२ हून अधिक गावांनी ग्रामसभेत दारू आणि सुगंधी तंबाखूयुक्त खर्राबंदीचा ठराव घेत गावाला नशामुक्त करण्याचा ध्यास घेतला.

ठळक मुद्देग्रामसभेत एकवटले गावकरी : बंदी टिकवून गाव नशामुक्त करण्याचा ध्यास

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : तालुक्यातील उडेरा, बुर्गी, येमली, तुमरगुंडा तोडसा, शेवारी, मानेवाडा आणि गुरुपल्ली ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या २२ हून अधिक गावांनी ग्रामसभेत दारू आणि सुगंधी तंबाखूयुक्त खर्राबंदीचा ठराव घेत गावाला नशामुक्त करण्याचा ध्यास घेतला. मुक्तिपथ तालुका चमूच्या सहकार्याने गाव संघटनेने यासाठी परिश्रम घेतले. केवळ दारूबंदीचा ठराव नाही, तर ही बंदी टिकविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे ग्रामसभेत गावकऱ्यांनी सांगितले.तालुक्यातील उडेरा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या उडेरा(स), उदेरा(म), आलदंडी, परसलगोंदी, रेखानार या गावांनी गावसंघटनेच्या माध्यमातून दोन महिन्यापूर्वीच गावात दारूबंदी केली. एवढ्यावरच न थांबता शुक्रवारी उडेरा गावात सर्व गावांची एकत्रित ग्रामसभा झाली. यावेळी सर्व गावांनी दारूविक्री आणि खर्राविक्री बंद करण्याचा ठराव घेतला. बुर्गी गावात ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मरकल, फुंडी, पैमा, अबनपल्ली गावांची एकत्रित ग्रामसभा घेण्यात आली.या गावांनीही अनेक दिवसांपासून गाव संघटनेमार्फत दारू व सुगंधित तंबाखूयुक्त खर्राविक्री बंद केली आहे. या आठवड्यात ग्रामसभेत हा ठराव पारित करून या निर्णयावर त्यांनी शिक्कामोर्तब किले. त्याचबरोबर शेवारी, मानेवाडा, गुरुपल्ली या गावांसह तोडसा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांनी ग्रामसभेत दारूबंदीचे ठराव घेतले. मुक्तिपथ तालुका चमूने यासाठी सहकार्य केले.तुमरगुंडा गावाचा दारूसह खर्ऱ्याच्या कायम बंदीचा ठरावतालुक्यातील तुमरगुंडा गावाने दोन महिन्यापूर्वी गावातील खर्रा व दारूविक्री पूर्णपणे बंद केली आहे. ही बंदी अशीच टिकून गावात शांतता नांदावी, यासाठी गावसंघटन आणि ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत. त्यासाठी म्हणून येथील ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन दारू व खर्रा कायम बंदीचा ठराव घेतला.केवळ दारूबंदीचा ठराव घेऊन चालणार नाही, तर ही बंदी टिकविण्यासाठी गावसंघटन आणि गावकऱ्यांनी प्रयत्न करण्याची गरज मुक्तिपथ तालुका चमूने लक्षात आणून दिली. त्यामुळे बंद केलेली दारू पुन्हा गावात कुठल्याही मागार्ने सुरू होऊ नये, यासाठी प्रयत्न करणार असल्याने ठरावात गावकऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :liquor banदारूबंदी