रांगी प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत २० व्यक्ती काेराेनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:37 IST2021-04-24T04:37:18+5:302021-04-24T04:37:18+5:30
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ११ हजार ६३० लाेकसंख्या आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात ४१९ लाेकांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. ...

रांगी प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत २० व्यक्ती काेराेनाबाधित
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ११ हजार ६३० लाेकसंख्या आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात ४१९ लाेकांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. त्यात २० रुग्ण बाधित आढळून आले. यामध्ये रांगी, सोडे, येरंडी आणि चिगंली आदी गावातील रुग्णांचा समावेश आहे. गुरुवारी रांगी येथे १७ तपासण्या करण्यात आल्या. यात तीन व्यक्ती बाधित आढळून आले. सोडे येथे ३६ लाेकांची चाचणी करण्यात आली. यापैकी नऊ जण सकारात्मक आढळून आले. परंतु अनेक व्यापारी, दुकानदार तसेच अन्य लोकांनी चाचणी करून घेतली नाही. ग्रामीण भागात तपासणी करण्यास नागरिक नकार देत असल्याचे दिसून येत आहे. आरोग्य कर्मचारी, दुकानदार तसेच अत्यावश्यक सेवेतील लोकांची तपासणी केली जात आहे. तपासणीत बाधित आढळलेल्यांना गृहविलगीकरणात ठेवले जात आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. सोयाम यांनी दिली. काेविड चाचणी करण्यासाठी डॉ. संध्या सिंग, औषधी संयोजक अंकित हेमके, परिचारिका सुनीता हिचामी, राजश्री वलादे, माेहम्मद पठाण यांच्यासह आराेग्य कर्मचारी सहकार्य करीत आहेत.
===Photopath===
230421\23gad_5_23042021_30.jpg
===Caption===
रांगी येथे संशयीतांचे नमुने घेताना आराेग्य कर्मचारी.