२० रुग्णांचा दारू सोडण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:32 AM2021-01-21T04:32:48+5:302021-01-21T04:32:48+5:30

गडचिरोली : तालुक्यातील काटली येथे गाव संघटनेच्या मागणीनुसार मुक्तिपथ अभियानातर्फे एक दिवशीय व्यसन उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. या ...

20 patients decide to give up alcohol | २० रुग्णांचा दारू सोडण्याचा निर्धार

२० रुग्णांचा दारू सोडण्याचा निर्धार

Next

गडचिरोली : तालुक्यातील काटली येथे गाव संघटनेच्या मागणीनुसार मुक्तिपथ अभियानातर्फे एक दिवशीय व्यसन उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून एकूण २० रुग्णांनी पूर्ण उपचार घेत दारूमुक्त होण्याचा निर्धार केला.

शिबिराला भेट दिलेल्या रुग्णांना दारूचे व्यसन हा एक मानसिक आजार आहे आणि तो उपचाराने बरा होतो. दारूची सवय सोडण्यासाठी तसेच यातून उद्भवणारा त्रास कमी करण्यासाठी उपचार घेणे आवश्यक आहे. दारूची सवय कशी लागते, शरीरावर कोणते दुष्परिणाम दिसतात, धोक्याचे घटक, नियमित औषधोपचार घेणे आदींची माहिती देत अरुण भोसले यांनी समुपदेशन केले. शिबिर संयोजक प्रमोद कोटांगले यांनी रुग्णांची माहिती घेतली. शिबिराचे नियोजन तालुका संघटक अमोल वाकुडकर, उपसंघटक रेवनाथ मेश्राम यांनी केले. यशस्वीतेसाठी गाव संघटनेचे सदस्य अरविंद चौधरी यांनी सहकार्य केले.

Web Title: 20 patients decide to give up alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.