शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

२ हजार ९३ पोस्टल मतदार

By admin | Updated: October 8, 2014 23:26 IST

सर्वसामान्य नागरिकांसाठी मतदान करण्याकरिता ईव्हीएम मशीनची सुविधा करण्यात आली आहे. मतदान केंद्रावरील कर्मचारी, बंदोबस्तात असलेले जवान यांनाही मतदान करता यावे,

गडचिरोली : सर्वसामान्य नागरिकांसाठी मतदान करण्याकरिता ईव्हीएम मशीनची सुविधा करण्यात आली आहे. मतदान केंद्रावरील कर्मचारी, बंदोबस्तात असलेले जवान यांनाही मतदान करता यावे, यासाठी पोष्टल मतदानाची सुविधा करण्यात आली आहे. गडचिरोली, आरमोरी, अहेरी हे तिनही विधानसभा क्षेत्र मिळून सध्य:स्थितीत २ हजार ९३ एवढे पोष्टल मतदार आहेत. नमुना १२ चे अर्ज वितरणाची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे पोष्टल मतदारांच्या संख्येनेमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. १५ आॅक्टोबरच्या विधानसभा निवडणुकीत १०० टक्के पोष्टल मतदान होण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. ६७ आरमोरी विधानसभा क्षेत्रात ईडीसी नमूना १२ अ मधील एकूण ८०६ पोष्टल मतदार आहेत. पीबी नमूना १२ मधील २६ मतदार व सेवेतील मतदारांची संख्या ९२ असे एकूण ९२४ पोष्टल मतदार आहेत. ६८ गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ईडीसी नमूना १२ मधील ६२९, पीबी नमूना १२ मधील ७० व सेवेतील मतदार ९३ असे एकूण ७९२ पोष्टल मतदार आहेत. ६९ अहेरी विधानसभा क्षेत्रात एकूण ३७७ पोस्टल मतदार आहेत. यामध्ये ईडीसी नमूना १२ अ मधील २७५, पीबी नमूना १२ मधील ५५ व सेवेमधील मतदारांची संख्या ४७ आहे. सध्य:स्थितीत आरमोरी विधानसभा क्षेत्रात पीबी नमूना १२ नुसार २० पोष्टल मतदारांना पोष्टल मतपत्रिका वितरीत करण्यात आले आहे. सेवेतील ९२ मतदारांना पोष्टल मतपत्रिका वितरीत करण्यात आले आहे. गडचिरोली विधानसभा क्षेत्रात सेवेतील ७८ मतदारांना पोष्टल मतपत्रिका वितरीत करण्यात आले असून अहेरी विधानसभा क्षेत्रातील पीबी नमूना १२ नुसार एका मतदाराला व सेवेतील ४७ अशा एकूण ४८ पोष्टल मतदारांना पोष्टल मतपत्रिका वितरीत करण्यात आले आहे. तिनही विधानसभाक्षेत्र मिळून ५ आॅक्टोबरपर्यंत २३८ पोष्टल मतदारांना पोष्टल मतपत्रिका वितरीत करण्यात आले आहे.तिनही विधानसभाक्षेत्र मिळून एकूण १ हजार ८४९ पोष्टल मतदारांना पोष्टल मतपत्रिकेचे वितरण करणे शिल्लक आहे. मतदानाच्या दोन दिवसापूर्वी उर्वरित सर्व पोष्टल मतदारांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने पोष्टल मतपत्रिकेचे वितरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पोष्टल मतदारांमध्ये मतदान केंद्रावरील कर्मचारी म्हणजे केंद्राध्यक्ष, क्षेत्रीय अधिकारी, सहाय्यक कर्मचारी तसेच सुरक्षा कर्मचारी यांचा समावेश आहे. ज्या विधानसभा क्षेत्रातील ज्या मतदान केंद्रावर मतदान तसेच सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशा कर्मचाऱ्यांना त्याच मतदान केंद्रावर पोष्टल मतदान करण्याची सुविधा देण्यात आली आहे. पोष्टल मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने मतदान केंद्रांवरील सर्व कर्मचाऱ्यांनी अवश्य मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. (प्रतिनिधी)