विज्ञान प्रदर्शनात ९६ शाळा सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 05:00 IST2019-12-17T05:00:00+5:302019-12-17T05:00:32+5:30

चामोर्शी पंचायत समिती अंतर्गत तालुकास्तरीय तीन दिवसीय विज्ञान प्रदर्शन भेंडाळा येथील विश्वशांती विद्यालयात आयोजित करण्यात आल्या आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन सोमवारी पं. स. सदस्य धर्मशीला सहारे यांच्या हस्ते झाले. प्रदर्शनात तालुक्यातील एकूण ९६ शाळा सहभागी झाल्या आहेत.

19 schools participated in science exhibition | विज्ञान प्रदर्शनात ९६ शाळा सहभागी

विज्ञान प्रदर्शनात ९६ शाळा सहभागी

भेंडाळा येथे कार्यक्रम : विविध विषयांवरील प्रतिकृतींचे सादरीकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
भेंडाळा : चामोर्शी पंचायत समिती अंतर्गत तालुकास्तरीय तीन दिवसीय विज्ञान प्रदर्शन भेंडाळा येथील विश्वशांती विद्यालयात आयोजित करण्यात आल्या आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन सोमवारी पं. स. सदस्य धर्मशीला सहारे यांच्या हस्ते झाले. प्रदर्शनात तालुक्यातील एकूण ९६ शाळा सहभागी झाल्या आहेत.
‘शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान’ हा मुख्य विषय विज्ञान प्रदर्शन आयोजनामागील आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं. स. सभापती आनंद भांडेकर होते. प्रमुख अतिथी म्हणून सरपंच वनिता पोरेड्डीवार, गटविकास अधिकारी नितेश माने, गटशिक्षणाधिकारी नरेंद्र म्हस्के, शिक्षण विस्तार अधिकारी मंगलदास कडते, पं. स. सदस्य संगीता भोयर, दादाजी बारसागडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राकेश येगलोपवार, प्रमोद सहारे, देविदास भोयर, संजय चलाख, संध्या सातपुते, मुख्याध्यापक दिलीप डांगे, पर्यवेक्षक विजय भुरसे उपस्थित होते. विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील माध्यमिक गटातून ३२ तर प्राथमिक गटातून ६४ शाळांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला आदिवासी व लोकसंस्कृतीवर आधारित नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले. प्रास्ताविकातून कडते यांनी विज्ञान प्रदर्शनाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. दरम्यान उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन रोशन थोरात तर आभार प्रशांत कोटगिरवार यांनी मानले. यशस्वीतेसाठी विश्वशांती विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन पुन्हा दोन दिवस राहणार असून शेवटच्या दिवशी विविध गटातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरित करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड होणार आहे.

प्रतिकृतींचा जीवनात उपयोग व्हावा
गटविकास अधिकारी माने यांनी औद्योगिक क्रांती या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करून विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त गुणांना वाव द्यावा, तसेच प्रतिकृतींचा दैैनंदिन जीवनात उपयोग करण्याच्या दृष्टीने संशोधन करावे, असे आवाहन केले. पं. स. सभापती आनंद भांडेकर यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाविषयी माहिती देत विज्ञान व तंत्रज्ञान एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या दोन्ही बाबींकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन केले. पं. स. सदस्य धर्मशीला सहारे यांनी विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचे महत्त्व पटवून देत दैैनंदिन जीवनात व्यक्तीला तंत्रज्ञानाचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाच्या माध्यमातून तंत्रज्ञानविषयक गुण अवगत करावे, असे आवाहन केले.

Web Title: 19 schools participated in science exhibition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.