१७ कोटी ३५ लाखांवर शिष्यवृत्तीची खैरात
By Admin | Updated: February 7, 2015 00:48 IST2015-02-07T00:48:43+5:302015-02-07T00:48:43+5:30
गडचिरोली जिल्ह्यात सत्र २०१३-१४ मध्ये समाज कल्याण विभागाकडे ४६४७ विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली.

१७ कोटी ३५ लाखांवर शिष्यवृत्तीची खैरात
चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात सत्र २०१३-१४ मध्ये समाज कल्याण विभागाकडे ४६४७ विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यात २५६३, गडचिरोली जिल्ह्यातील २०८४ विद्यार्थ्यांचे नामांकन समाज कल्याण विभागाकडे करण्यात आले होते. तर आदिवासी विकास विभागाकडे चंद्रपूर जिल्ह्यात १०५२ व गडचिरोली जिल्ह्यात ११३१ विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली होती. चंद्रपूर जिल्ह्यात समाज कल्याण व आदिवासी विकास विभागाकडे मिळून ३६१५ तर गडचिरोली जिल्ह्यात ३२१५ विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली. दोन्ही जिल्ह्यात आदिवासी विकास व समाज कल्याण विभाग मिळून ६८३० विद्यार्थ्यांची नोंदणी झाली. त्यापैकी ५०७५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप दोनच जिल्ह्यात करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यात समाज कल्याण विभागाने २४०८, गडचिरोली जिल्ह्यात १६३३ तर आदिवासी विकास विभागाने चंद्रपूर जिल्ह्यात १०१ व गडचिरोली जिल्ह्यात ९३३ अशा एकूण १०३४ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप केले. दोन्ही विभागाने मिळून चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात ५०७५ विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. ३४ हजार २०५ रूपये प्रमाणे समाज कल्याण विभागाने १३ कोटी ८२ लाख २२ हजार ४०५ तर आदिवासी विकास विभागाने ३ कोटी ५३ लाख ६७ हजार ९७० रूपयाच्या शिष्यवृत्तीचे वाटप चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात केले. या शिष्यवृत्ती वाटपात आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी व समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त यांची अत्यंत मोठी भूमिका राहिली आहे. त्यामुळे त्यांचीही चौकशी होणे आवश्यक आहे. एका सहायक आयुक्तांनी आपल्या कार्यकाळात १३ कोटी ८२ लाख २२ हजार ४०५ रूपयांचे वाटप केलेले आहे, हे विशेष. दोन जिल्ह्यात वाटप झालेल्या शिष्यवृत्तीच्या रक्कमेत प्रचंड गौडबंगाल झाल्याचा प्रकरण आदिवासी विकास विभागात उजेडात आला आहे.
मात्र या प्रकरणात समाज कल्याण विभागाचे, दोन जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प कार्यालयाचे अधिकारीही सहभागी असल्याने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी सध्या मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. शासनाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष आहे.