१५ हजार क्विंटल धान उघड्यावर पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 05:00 IST2020-06-27T05:00:00+5:302020-06-27T05:00:39+5:30
खरेदी-विक्री संघाच्या वतीने मार्र्कंडा कंसोबा येथे परिसरातील शेतकऱ्यांसाठी धान विक्रीची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे या भागातील अनेक शेतकऱ्यांनी सदर धान खरेदी केंद्रावर आपल्याकडील माल विक्री केला. यावर्षी २० हजार क्विंटल ३२४ किलो धानाची खरेदी झाली. यापैैकी ४ हजार ४६३ क्विंटल २२ किलो धानाची उचल झाली. उर्वरित धान गोदाम परिसरातील पटांगणात ताडपत्री झाकून ठेवले आहे.

१५ हजार क्विंटल धान उघड्यावर पडून
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : आदिवासी विकास महामंडळांतर्गत खरेदी-विक्री संघाच्या वतीने मार्र्कंडा कंसोबा येथे यावर्षी २० हजार क्विंटल ३२४ किलो धानाची खरेदी करण्यात आली. यापैैकी केवळ ४ हजार ४६३ क्विंटल २२ किलो धानाची उचल झाली. उर्वरित १५ हजार क्विंटल १७८ किलो धान गोदामालगतच्या परिसरात ताडपत्री झाकून ठेवले आहे. पावसाळा सुरू झाल्याने अतिवृष्टीत धान भिजून नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
खरेदी-विक्री संघाच्या वतीने मार्र्कंडा कंसोबा येथे परिसरातील शेतकऱ्यांसाठी धान विक्रीची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे या भागातील अनेक शेतकऱ्यांनी सदर धान खरेदी केंद्रावर आपल्याकडील माल विक्री केला. यावर्षी २० हजार क्विंटल ३२४ किलो धानाची खरेदी झाली. यापैैकी ४ हजार ४६३ क्विंटल २२ किलो धानाची उचल झाली. उर्वरित धान गोदाम परिसरातील पटांगणात ताडपत्री झाकून ठेवले आहे. पावसाळा सुरू झाल्याने झाकून ठेवलेले धान खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरवर्षी महामंडळाच्या वतीने धानाची खरेदी केली जाते. परंतु योग्यवेळी धानाची उचल होत नाही. मार्र्कंडा कंसोबा येथे खरेदी केलेल्या धानापैैकी पाऊण टक्के धानाची उचल झाली नाही. गोदामामध्ये धान ठेवण्यासाठी जागा नसल्याने धानाचे कट्टे बाहेर मोकळ्या जागेत ताडपत्री झाकून ठेवले आहेत. आधारभूत भावांतर्गत १ हजार ८१५ व १ हजार ८३५ रूपये प्रति क्विंटल दराने जाड व बारीक धानाची खरेदी करण्यात आली. यावर ७०० रूपये बोनस शेतकऱ्यांना मिळणार होते. त्यामुळे सुरूवातीपासूनच खरेदी केंद्रावर धान विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होती. लॉकडाऊनच्या कालावधीत काही दिवस धान खरेदी बंद झाली होती. मात्र मुदतवाढीनंतर पुन्हा धान खरेदी सुरू झाली. परंतु खरेदी केलेल्या धानाची उचल अद्यापही केली नाही.
सर्वत्र एकसारखी स्थिती
चामोर्शी तालुका लोकसंख्या व आकारमानाच्या दृष्टीने जिल्ह्यात मोठा आहे. त्या मानाने तालुक्यात आदिवासी विकास महामंडळ व मार्केटिंग फेडरेशनचे खरेदी केंद्र आहेत. या केंद्रांद्वारे खरेदी केलेले धान गोदामाअभावी मोकळ्या जागेत ताडपत्री झाकून ठेवले आहेत.