१५ नक्षल्यांचे आत्मसर्मपण
By Admin | Updated: June 4, 2014 00:04 IST2014-06-04T00:04:29+5:302014-06-04T00:04:29+5:30
राज्य शासनाने नक्षलवाद्यांसाठी आत्मसर्मपण योजनेस २८ ऑगस्ट २0१५ पर्यंत मुदतवाढ दिल्याने या योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी यांच्या आत्मसर्मपण निश्चिती व पुनर्वसन समिती समक्ष

१५ नक्षल्यांचे आत्मसर्मपण
चालू वर्ष : १0 व्या टप्प्यात २३ नक्षल्यांनी स्वीकारले नवजीवन
गडचिरोली : राज्य शासनाने नक्षलवाद्यांसाठी आत्मसर्मपण योजनेस २८ ऑगस्ट २0१५ पर्यंत मुदतवाढ दिल्याने या योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी यांच्या आत्मसर्मपण निश्चिती व पुनर्वसन समिती समक्ष २३ नक्षलवाद्यांनी पोलीस अधीक्षकांच्या माध्यमातून आत्मसर्मपण केले तर चालू वर्षात माहे मे २0१४ पर्यंत १५ नक्षल्यांनी आत्मसर्मपण केले आहे.
ध्येयविसंगत नक्षली चळवळ व शोषणाला कंटाळून मोठय़ा प्रमाणात नक्षली आत्मसर्मपणाचा मार्ग स्वीकारत आहेत. २0१३ या वर्षात ४८ नक्षल्यांनी आत्मसर्मपण केले असून त्यात ३ कंपनी डीव्हीसी, १ कमांडर, ३ उपकमांडर व ४१ नक्षलींचा समावेश होता. चालू वर्षात माहे मे २0१४ पर्यंत १५ नक्षल्यांनी आत्मसर्मपण केले असून त्यात एक कंपनी डीव्हीसी, १ कमांडर, २ उपकमांडर अशा १५ नक्षल्यांचा समावेश आहे. अनेक नक्षलवादी हे चळवळ सोडून पळून गेल्याचे व आत्मसर्मपण करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आत्मसर्मपितांकडून मिळाली आहे. दक्षिण गडचिरोलीतील नक्षलीदृष्टीने महत्वाच्या मानल्या गेलेल्या कंपनी क्रमांक १0 मधील अध्र्याहून अधिक नक्षली पळून गेल्याची माहिती पुढे आली आहे.
गडचिरोलीतील नक्षली चळवळीसाठी सदर बाब धक्कादायक असून नैराशाने आत्मसर्मपितांची हत्या करणे, नक्षल चळवळ सोडलेल्या नक्षल्यांनी आत्मसर्मपण करू नये यासाठी त्यांना धमकावणो, असे प्रकार गडचिरोलीतील नक्षली चळवळीतील वरिष्ठ नेत्यांकडून सुरू असल्याचे सध्या दिसून येत आहे. त्यामुळे सध्यास्थितीत नक्षल चळवळीस उतरती कळा लागली असल्याचे चित्र आहे. (शहर प्रतिनिधी)