महिलांनी पकडली १५ निपा दारू

By Admin | Updated: March 20, 2016 01:10 IST2016-03-20T01:10:35+5:302016-03-20T01:10:35+5:30

येथील दारूबंदी समितीच्या महिलांनी गेल्या काही दिवसांपासून अवैध दारू विक्रेत्यांविरोधात धाडसत्र सुरू केले आहे.

15 napa liquor caught by women | महिलांनी पकडली १५ निपा दारू

महिलांनी पकडली १५ निपा दारू

दारूबंदी समितीचा पुढाकार : मुद्देमाल केला पोलिसांकडे सुपूर्द
भामरागड : येथील दारूबंदी समितीच्या महिलांनी गेल्या काही दिवसांपासून अवैध दारू विक्रेत्यांविरोधात धाडसत्र सुरू केले आहे. दरम्यान दारूबंदी समितीच्या महिलांनी शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास शहरातील दारू विक्रेत्याच्या घरी धाड टाकून देशी व विदेशी दारूच्या १५ निपा जप्त केल्या. त्यानंतर सदर महिलांनी ही दारू भामरागड पोलिसांकडे सुपूर्द केली.
दारूच्या पंचनाम्यादरम्यान भामरागड येथील दारूबंदी समितीच्या अध्यक्ष वसंती मडावी, उपाध्यक्ष रमा टेंभुर्णे, पुष्पा कुळमेथे, भारती इष्टाम, यशोदा उईके, शिला येलवार, शांता मडावी, गिरमा मडावी, सुकरी तलांडे, मैनी सडमेक, ललिता गुम्मा, आशा पिळसे, कल्पना मडावी, सपना रामटेके, निर्मला सडमेक, पेंटा पोटावी, पीएसआय भूषण बैसाने, पोलीस हवालदार गडबले, नैताम हजर होते.

Web Title: 15 napa liquor caught by women