१५ लिटर माेहफूल दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:36 IST2021-03-16T04:36:16+5:302021-03-16T04:36:16+5:30
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील रेखेगाव, जाणाळा येथील १२ दारू विक्रेत्यांच्या घरावर घोट पोलीस व मुक्तीपथ तालुका चमूने संयुक्तरीत्या धाड ...

१५ लिटर माेहफूल दारू जप्त
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील रेखेगाव, जाणाळा येथील १२ दारू विक्रेत्यांच्या घरावर घोट पोलीस व मुक्तीपथ तालुका चमूने संयुक्तरीत्या धाड टाकली. दरम्यान, एका दारू विक्रेत्या महिलेकडून दोन हजार रुपये किमतीची १५ लिटर दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी गीता कुमोटी (४२), रा. रेखेगाव हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
घोट परिसरातील रेखेगाव, जानाळा येथे अवैध दारू विक्री केली जाते. यामुळे परिसरातील गावांतील मद्यपींची रांग लागते. या गावातील दारू विक्रेत्यांविरोधात वारंवार तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यामुळे घोट पोलीस व मुक्तीपथ तालुका चमूने या गावातील दारू विक्रेत्यांना धडा शिकविण्याचे नियोजन केले. त्यानुसार रेखेगाव, जाणाळा या दोन्ही दारू विक्रेत्यांच्या घरांची तपासणी करण्यात आली. पोलीस गावात दाखल झाल्याचे समजताच दारू विक्रेत्यांनी आपल्याकडील दारू इतरत्र लपवून पळ काढला. त्यामुळे एकाच घरी दारू मिळून आली. एका महिलेकडून १५ लिटर दारू जप्त करीत तिच्यावर घोट पोलीस मदत केंद्रात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तसेच या गावातील जंगल परिसरातील दारू अड्डे उद्ध्वस्त करीत दारू विक्रेत्यांना धडा शिकविण्यासाठी घोट पोलिसांनी कंबर कसली आहे.
जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या आदेशानुसार, ॲक्शन प्लॅननुसार दारू विक्रेत्यांविरोधात घोट पोलीस व मुक्तीपथ तालुका चमूने संयुक्तरीत्या कारवाई केली आहे. या मोहिमेत सहायक पोलीस निरीक्षक संदीप रोंढे, पोलीस उपनिरीक्षक आनंद श्रीमंगल, दिलीप सोनटक्के, मुक्तीपथ तालुका संघटक आनंद इंगळे व पोलीस पथक सहभागी झाले होते.