जिनिंगच्या आगीत १५ लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 05:00 IST2020-06-10T05:00:00+5:302020-06-10T05:00:47+5:30
गडचिरोली जिल्ह्यात अनखोडा येथे एकमेव जिनिंग फॅक्टरी आहे. या ठिकाणी चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून खासगी व्यापारी, शेतकरी कापूस विक्रीला आणतात. कापसाची जिनिंग सुरू असताना शॉर्ट सर्कीटमुळे अचानक आग लागली. काही वेळातच आगीने उग्ररूप धारण केले. अग्निशमन पथकास बोलाविण्यात आले. वाहन पोहोचेपर्यंत जिनिंगमधील बराचसा कापूस, इतर साहित्य तसेच प्रेस मशीनरीज जळून खाक झाली.

जिनिंगच्या आगीत १५ लाखांचे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : अनखोडा येथील आस्था जिनिंगला ६ जूनच्या मध्यरात्री आग लागली. या आगीत जवळपास १५ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. आग लागल्याने कापूस खरेदी बंद करण्यात आली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात अनखोडा येथे एकमेव जिनिंग फॅक्टरी आहे. या ठिकाणी चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून खासगी व्यापारी, शेतकरी कापूस विक्रीला आणतात. कापसाची जिनिंग सुरू असताना शॉर्ट सर्कीटमुळे अचानक आग लागली. काही वेळातच आगीने उग्ररूप धारण केले. अग्निशमन पथकास बोलाविण्यात आले. वाहन पोहोचेपर्यंत जिनिंगमधील बराचसा कापूस, इतर साहित्य तसेच प्रेस मशीनरीज जळून खाक झाली. यामध्ये जवळपास १५ लाख रूपयांचे नुकसान झाले. जिनिंगमध्ये कापूस ठेवायला जागा नसल्याने १ जूनपासून खरेदी बंद होती. ८ जूनपासून खरेदी सुरू होणार होती. मात्र शनिवारच्या रात्री आग लागल्याने शेतकऱ्यांचे नुकसान टळले.
घटनेची तक्रार आष्टी पोलीस स्टेशनला देण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक धमेंद्र मडावी यांनी पंचनामा केला. चामोर्शीचे तहसीलदार संजय गंगथडे, मंडळ अधिकारी एस. राऊत, तलाठी एस. जे. नाईक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार यांनी भेट देऊन पाहणी केली.