ध्वनिप्रदूषण कायद्यातून वर्षभरात १५ दिवस सूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:37 IST2021-03-26T04:37:16+5:302021-03-26T04:37:16+5:30

ध्वनिप्रदूषण नियंत्रण व नियमन कायद्यानुसार खुल्या जागांमध्ये विहित मर्यादेच्या अधीन राहून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सूट देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर ...

15 days exemption from Noise Pollution Act throughout the year | ध्वनिप्रदूषण कायद्यातून वर्षभरात १५ दिवस सूट

ध्वनिप्रदूषण कायद्यातून वर्षभरात १५ दिवस सूट

ध्वनिप्रदूषण नियंत्रण व नियमन कायद्यानुसार खुल्या जागांमध्ये विहित मर्यादेच्या अधीन राहून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सूट देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर दिवस निश्चित केले आहेत. त्यात डॉ. आंबेडकर जयंती १४ एप्रिल, १ मे महाराष्ट्र दिन, तसेच गणेशोत्सवात (दुसरा दिवस, पाचवा दिवस, गौरी विसर्जन आणि गणपती विसर्जन अर्थात अनंत चतुर्दशी) हे तीन दिवस, नवरात्री अर्थात दुर्गा उत्सवात अष्टमी व नवमी हे दोन दिवस, विजयादशमीला एक दिवस (१५ ऑक्टोबर), दुर्गा विसर्जन (१६ ऑक्टोबर), दिवाळीत एक दिवस लक्ष्मीपूजन (४ नोव्हेंबर), ईद- ए- मिलाद (१९ ऑक्टोबर), ख्रिसमस (२५ डिसेंबर) आणि ३१ डिसेंबर या दिवसांचा समावेश आहे. उर्वरित दोन दिवस लोकांच्या मागणीनुसार पोलीस विभागाशी चर्चा करून सूट दिली जाणार आहे.

Web Title: 15 days exemption from Noise Pollution Act throughout the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.