१४ कोरोनामुक्त तर १२ नवीन बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:26 IST2021-07-18T04:26:27+5:302021-07-18T04:26:27+5:30

कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत बाधितांची संख्या ३० हजार ४९९ एवढी झाली आहे. त्यापैकी २९ हजार ६३२ जणांनी ...

14 corona free and 12 newly infected | १४ कोरोनामुक्त तर १२ नवीन बाधित

१४ कोरोनामुक्त तर १२ नवीन बाधित

कोरोनावर मात केली आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंत बाधितांची संख्या ३० हजार ४९९ एवढी झाली आहे. त्यापैकी २९ हजार ६३२ जणांनी काेराेनावर मात केली आहे. सध्या १२४ सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ७४३ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. नवीन मृत्यूमध्ये किष्टापूर ता. चामोर्शी येथील ४२ वर्षीय महिला तर दुसरी व्यक्ती ही आलापल्ली ता. अहेरी येथील ७३ वर्षीय महिलेचा समावेश आहे.

नवीन १२ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील तीन, चामोर्शी तालुक्यातील पाच, कोरची तालुक्यातील एक, कुरखेडा तालुक्यातील बाधितांमध्ये एक, सिरोंचा तालुक्यातील एक तर देसाईगंज तालुक्यातील एकाचा समावेश आहे. तर कोरोनामुक्त झालेल्या १४ रुग्णांमध्ये गडचिरोली मधील एक, चामोर्शी सहा, मुलचेरा तीन, सिरोंचा दोन, देसाईगंज तालुक्यातील दोन जणांचा समावेश आहे.

Web Title: 14 corona free and 12 newly infected