१३७० गावांमध्ये झाली फवारणी

By Admin | Updated: November 27, 2014 23:34 IST2014-11-27T23:34:28+5:302014-11-27T23:34:28+5:30

गडचिरोली जिल्ह्यात हिवतापाचा वाढता प्रादुर्भाव व त्यावर करण्यात येत असलेल्या उपाययोजनांच्या संबंधाने जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती जीवन नाट यांनी बुधवारी आढावा बैठक घेतली.

1370 spray in villages | १३७० गावांमध्ये झाली फवारणी

१३७० गावांमध्ये झाली फवारणी

साथरोगांवर आढावा बैठक : दवाखान्यातच जाऊन उपचार घ्या- जीवन नाट
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात हिवतापाचा वाढता प्रादुर्भाव व त्यावर करण्यात येत असलेल्या उपाययोजनांच्या संबंधाने जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती जीवन नाट यांनी बुधवारी आढावा बैठक घेतली.
या बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. आर. एस. ढोले, साथरोग अधिकारी डॉ. रविंद्र चौधरी उपस्थित होते. भामरागड, धानोरा, एटापल्ली, कोरची या तालुक्यांमध्ये हिवतापाचे रूग्ण मोठ्या प्रमाणावर असून कुरखेडा तालुक्यात मालेवाडा भागात प्रामुख्याने रूग्णांची संख्या अधिक आहे. अनियमित पाऊस व जास्त वेळ साचून राहिलेले पाणी यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होऊन हिवतापाचा प्रसार वाढला. जिल्ह्यामध्ये १३७० गावात किटकनाशकाची फवारणी करण्यात आली असून हिवतापाच्या रूग्णांची वाढ झालेल्या गावांसाठी स्वतंत्र कृती कार्यक्रम तयार करण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी या बैठकीत दिली. आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यक यांचे पथक गावामध्ये भेटी देत आहेत. औषधसाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांनी दिली. तापाच्या रूग्णांनी दवाखान्यात जाऊनच उपचार घ्यावे, असे आवाहन या बैठकीत जि.प. उपाध्यक्ष नाट यांनी केले. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: 1370 spray in villages