१३५ चालकांची नेत्रचिकित्सा
By Admin | Updated: January 22, 2015 01:16 IST2015-01-22T01:16:08+5:302015-01-22T01:16:08+5:30
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत वाहतूक शाखा, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, अप्पलवार आय हॉस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने ...

१३५ चालकांची नेत्रचिकित्सा
गडचिरोली : रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत वाहतूक शाखा, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, अप्पलवार आय हॉस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने आॅटो, ट्रॅव्हल्स, काळी-पिवळी टॅक्सी, ट्रक चालकांसाठी नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात १३५ वाहन चालकांची नेत्र तपासणी करण्यात आली.
धानोरा मार्गावरील अप्पलवार आय हॉस्पिटलमध्ये शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. हेमंत अप्पलवार, डॉ. अद्वय अप्पलवार व त्यांच्या चमूने शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागातून आलेल्या वाहन चालकांची नेत्र तपासणी करण्यात आली.
शिबिरात वाहतूक शाखेच्या वतीने नाव नोंदणीसाठी विशेष सोय करण्यात आली होती. वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. डॉ. हेमंत अप्पलवार यांनी नेत्र रूग्णांना आजाराच्या विविध प्रकारांविषयी माहिती दिली. उन्हापासून डोळ्यांचे संरक्षण करावे, तसेच टीव्ही, संगणक पाहतांना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन केले.
नेत्र चिकित्सा शिबिरात ट्रक चालक-मालक संघटना, आॅटो चालक संघटना, काळी-पिवळी टॅक्सी चालक संघटनेच्या सदस्यांनी सहभाग घेतला. सकाळी ९ वाजतापासून नेत्र चिकित्सा शिबिराला सुरूवात झाली. त्यानंतर सायंकाळी ५ वाजेपर्यंत शिबिर घेण्यात आला. मागील तीन वर्षांपासून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय व अप्पलवार आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त वाहन चालकांसाठी नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन केले जात आहे. वाहतूक शाखा व आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)