१३३ निराधारांना मिळणार याेजनेचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:19 IST2021-09-02T05:19:11+5:302021-09-02T05:19:11+5:30
सभेला समितीचे अध्यक्ष प्रमाेद भगत, प्रभारी तहसीलदार आम्रपाली लोखंडे, गटविकास अधिकारी नीतेश माने, विलास ठोंबरे, अमित यासलवार, ...

१३३ निराधारांना मिळणार याेजनेचा लाभ
सभेला समितीचे अध्यक्ष प्रमाेद भगत, प्रभारी तहसीलदार आम्रपाली लोखंडे, गटविकास अधिकारी नीतेश माने, विलास ठोंबरे, अमित यासलवार, ॲड. डिम्पल उंदीरवाडे, शंकर मारशेट्टीवार, लिपिक देवांगना सहारे उपस्थित होते. सभेत संजय गांधी अनुदान योजनेचे ४६ पैकी ४४ अर्ज मंजूर, तर २ नामंजूर, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजनेचे ९ प्रकरणे मंजूर, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजनेची ३४ प्रकरणे मंजूर, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेचे ४६ अर्ज मंजूर तर ४ नामंजूर झाले. सभेत एकूण १३३ प्रकरणे मंजूर करण्यात आली, तर ६ प्रकरणे नामंजूर झाली.
निराधार वृद्ध व्यक्ती, अंध, अपंग, शारीरिक व मानसिक आजाराने राेगग्रस्त, विधवा, देवदासी, अनाथ बालके यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विशेष साहाय्य योजनांच्या माध्यमातून मासिक अर्थसाहाय्य दिले जाते. या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन संजय गांधी याेजना समितीचे तालुकाध्यक्ष प्रमोद भगत यांनी केले.
010921\img-20210831-wa0201.jpg
निराधार योजना सभेचे फोटो