१३ गटांना दालमिल संच
By Admin | Updated: April 4, 2016 04:57 IST2016-04-04T04:57:43+5:302016-04-04T04:57:43+5:30
तूर, लाखोळी, हरभरा, मूग, उडीद आदी कडधान्यावर प्रक्रिया करण्यासाठी जि.प. कृषी विभागाच्या वतीने शेतकरी महिला गटांच्या

१३ गटांना दालमिल संच
दिलीप दहेलकर ल्ल गडचिरोली
तूर, लाखोळी, हरभरा, मूग, उडीद आदी कडधान्यावर प्रक्रिया करण्यासाठी जि.प. कृषी विभागाच्या वतीने शेतकरी महिला गटांच्या उत्पन्नात वाढ करण्याकरिता ९० टक्के अनुदानावर दालमिल संच देण्याची योजना हाती घेण्यात आली. या योजनेसाठी आदिवासी विभागाच्या गडचिरोली प्रकल्प कार्यालयाने ३० मार्च २०१६ रोजी जि.प. च्या कृषी विभागाला ११ लाख ७० हजार रूपयांचा निधी अदा केला आहे. या निधीतून सहा तालुक्यातील १३ शेतकरी महिला गटांना दालमिल संच देण्यात येणार आहे. याबाबतची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी गेल्या दोन-तीन वर्षांपासून विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहे. जि.प.चे तत्कालीन कृषी अधिकारी विजय कोळेकर यांच्या पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्यात कृषी यांत्रिकीकरणाची प्रक्रिया यशस्वीरित्या राबविण्यात आली. या नंतर जिल्ह्यातील अनेक महिला व पुरूष शेतकरी गट यांत्रिकीकरणातून दरवर्षी शेतीचे उत्पन्न वाढवित आहेत.
यांत्रिकीकरणाचा उपक्रम यशस्वी झाल्याने जि.प. कृषी विभागाने महिला शेतकरी गटांना दालमिल संच देण्याची योजना आखली. त्यानंतर पत्र पाठवून आदिवासी विकास विभागाला निधीची मागणी केली. जि.प. कृषी विभागाने तयार केलेल्या प्रस्तावात ११ तालुक्यातील २० शेतकरी महिला गटांना ९० टक्के अनुदानावर एकूण १८ लाख रूपयातून दालमिल संच देण्याचे नियोजन केले. यात १० टक्के रक्कमेचा हिस्सा संबंधित गटाने लोक सहभागातून अदा करण्याचे निश्चित करण्यात आले. या योजनेसाठी गडचिरोली आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडून निधी उपलब्ध झाल्यामुळे गडचिरोली, आरमोरी, कुरखेडा, कोरची, धानोरा व चामोर्शी या सहा तालुक्यातून शेतकरी गटांना दालमिल संच एप्रिल महिन्याच्या अखेरीस अदा करण्यात येणार आहे. या संदर्भात दालमिल संच खरेदीची कार्यवाही सुरू झाली आहे.
प्रती गटावर एक लाखाचा खर्च
४शेतकरी गटांना दालमिल संचामध्ये एकूण चार वस्तू देण्यात येणार आहे. यामध्ये दालमिल संच एक नग, स्पायरल सेपरेटर एक नग, धान्यकोठी १० नग, वजनकाटा व इतर साहित्यांचा समावेश आहे. दालमिल संच ७१ हजार रूपयांचे, १२ हजार रूपयातून स्पायरल सेपरेटर, १० हजार रूपयातून १० नग धान्यकोठी तसेच सात हजार रूपयांतून वजनकाटा व इतर साहित्य देण्यात येणार आहे. या सर्व साहित्यांची किमत एक लाख रूपये आहे. यात शेतकरी गटांना १० टक्के हिस्सा म्हणून अदा करावयाचे आहेत. तर ९० हजार रूपयांचे अनुदान प्रत्येक गटांना मिळणार आहे.
दालमिल संच वाटपासाठी निवड केलेले शेतकरी गट
तालुकाशेतकरी गटाचे नाव
गडचिरोलीराणी दुर्गावती महिला बचत गट धुंडेशिवणी
जिजाबाई आदिवासी महिला बचत गट चुरचुरा
जयसेवा महिला बचत गट गिलगाव
आरमोरीसावित्री महिला बचत गट वडधा
शुभलक्ष्मी महिला बचत गट कोजबी
जीवनज्योती महिला बचत गट कुरंडीमाल
कुरखेडाजागृती महिला शेतकरी स्वयंसहाय्यता गट भटेगाव सोनपूर
राणी दुगार्वती महिला बचत गट येंगलखेडा
कोरचीजनसेवा पुरूष बचत गट ढोलडोंगरी
धानोरानारमाता महिला बचत गट पांढरसडा
चामोर्शीप्रगती महिला बचत गट मार्र्कंडादेव
जयसेवा आदिवासी महिला स्वयंसहाय्यता समूह किष्टापूर टोला
पूजा महिला बचत गट पावीमुरांडा