बारावीची परीक्षा रद्द, पदवीचे प्रवेश कसे हाेणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:27 IST2021-06-06T04:27:19+5:302021-06-06T04:27:19+5:30

सर्वप्रथम केंद्रीय परीक्षा मंडळाने बारावीची परीक्षा रद्द केली. त्यानंतर राज्याच्या परीक्षा मंडळानेही परीक्षा रद्द केली आहे. बारावीच्या परीक्षेनंतर विविध ...

12th class exam canceled, how to get admission for degree? | बारावीची परीक्षा रद्द, पदवीचे प्रवेश कसे हाेणार?

बारावीची परीक्षा रद्द, पदवीचे प्रवेश कसे हाेणार?

सर्वप्रथम केंद्रीय परीक्षा मंडळाने बारावीची परीक्षा रद्द केली. त्यानंतर राज्याच्या परीक्षा मंडळानेही परीक्षा रद्द केली आहे. बारावीच्या परीक्षेनंतर विविध शाखांमध्ये प्रवेश घेतला जातो. त्यामुळे बारावीच्या परीक्षेला अत्यंत महत्त्व आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय आदी शाखांच्या प्रवेशासाठी स्वतंत्र सीईटी घेतली जाते. मात्र बी. एस्सी., बी. काॅम., बी.ए., बी.एस.डब्ल्यू. आदी अभ्यासक्रमांना प्रवेश देताना बारावीचे गुणच लक्षात घेतले जातात. परीक्षा रद्द झाल्याने सर्वांनाच भरमसाठी गुण मिळण्याची शक्यता असल्याने हुशार विद्यार्थ्यांचे फार माेठे नुकसान हाेणार आहे. कशापद्धतीने गुणदान केले जाते, याकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले आहे.

बाॅक्स

बाारावीनंतरच्या संधी

- बारावीनंतर विद्यार्थी विविध शाखांमध्ये त्याच्या आवडीनुसार प्रवेश घेतात, त्यामुळे बारावीच्या परीक्षेला विशेष महत्त्व आहे.

- बारावीनंतर वैद्यकीय, अभियांत्रिकी शाखांना प्रवेश मिळतो.

- ग्रामीण भागातील विद्यार्थी बी.ए., बि.एस.डब्ल्यू., बी.काॅम., बी.एस्सी. आदी शाखांमध्ये प्रवेश घेऊन पदवीचे शिक्षण पूर्ण करतात.

काेट

इयत्ता १२ वीचा निकाल हा महत्त्वाचा आहे. त्यामुळे निकाल तयार करताना अकरावीच्या गुणांसोबत विद्यार्थ्यांचे दहावीचे गुणसुद्धा विचारात घेणे गरजेचे आहे. ५० टक्के गुण दहावीचे घेण्यात यावेत व बाकी पन्नास टक्क्यांमध्ये अकरावी व शाळेच्या स्तरावरील गुण विचारात घेण्यात यावे. या पद्धतीने सर्वार्थाने निकाल तयार केल्यास त्यामध्ये हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही.

डॉ. पंकज चव्हाण, प्राचार्य, श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान महाविद्यालय, आष्टी

काेट

बारावीचे गुणदान करताना दहावीचे २५ गुण, अकरावीचे २५ गुण, ३० गुणांचे स्वाध्याय व २० गुणांची तोंडी किंवा प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण विचारात घ्यावे. पदवीच्या प्रवेशाला बारावीच्या गुणांच्याआधारे विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा. अभियांत्रिकी, वैद्यकीय किंवा इतर तांत्रिक अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र सीईटी घेतली जाते. यात बारावीच्या गुणांचा विचार हाेत नाही. मला बारावीमधे कमी गुण मिळाले, असे एखाद्या विद्यार्थ्याला वाटत असेल, तर शासनाने परिस्थिती सुरळीत झाल्यावर त्याची परीक्षा घ्यावी, जेणे करून त्याच्या मनात कोणताच संशय राहणार नाही.

दिलीप डांगे, प्राचार्य, विश्वशांती विद्यालय तथा ज्युनिअर काॅलेज, भेंडाळा

काेट

विद्यार्थी काय म्हणतात

काेराेनाचे संकट लक्षात घेता, बारावीची परीक्षा रद्द केली, हे जरी मान्य असले, तरी याेग्य पद्धतीने मूल्यांकन करून हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान हाेणार नाही, याची खबरदारी परीक्षा मंडळ व शिक्षकांनी घेण्याची गरज आहे.

सचिन बारापात्रे, विद्यार्थी

बारावीच्या परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळावे, यासाठी आपण वर्षभर अभ्यास केला. ऑनलाईन पद्धतीने शिकून अभ्यासक्रम समजून घेताना अनेक अडचणी येत हाेत्या. तरीही अभ्यास केला. परीक्षा देऊन जे गुण मिळाले असते त्या निकालाचा आनंद काही वेगळाच असता.

हेमंत मडावी, विद्यार्थी

बारावीतील एकूण विद्यार्थी

मुले - ६७९८

मुली - ६४३०

Web Title: 12th class exam canceled, how to get admission for degree?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.