शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

FIFA U-17 World Cup : १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल: आज ग्रुप आॅफ डेथची रंगणार चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 07:05 IST

स्टार खेळाडूंचा भरणा असलेला इंग्लंड संघ आपल्या पहिल्या सामन्यात चिलीच्या आव्हानाला सामोरे जाईल. ग्रुप आॅफ डेथ असलेल्या या गटातील दोन बलाढ्य संघ एकमेकांविरुद्ध खेळणार असल्याने स्टेडियम खचाखच भरलेले असणार हे नक्की.

स्टार खेळाडूंचा भरणा असलेला इंग्लंड संघ आपल्या पहिल्या सामन्यात चिलीच्या आव्हानाला सामोरे जाईल. ग्रुप आॅफ डेथ असलेल्या या गटातील दोन बलाढ्य संघ एकमेकांविरुद्ध खेळणार असल्याने स्टेडियम खचाखच भरलेले असणार हे नक्की. सराव सामन्यांत इंग्लंडने न्यूझीलंडला ३-२ असे नमवले होते आणि हीच कामगिरी कायम राखण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. मँचेस्टर युनायटेडचे स्टार खेळाडू अँजेल गोम्स आणि जाडेन सांचो यांच्या समावेशामुळे इंग्लंड कागदावर मजबूत दिसत आहे. दुसरीकडे, १९९७ नंतर पहिल्यांदाच चिली या स्पर्धेत खेळत आहे.‘इ’ गटयुवा विश्वचषकातील आजचे सामने...फ्रान्स विजयी सलामीसाठी सज्ज...युरोपियन चॅम्पियन फ्रान्स युवा विश्वचषक स्पर्धेत पदार्पण करत असलेल्या नवख्या न्यू कॅलेडोनिया संघाविरुद्ध बाजी मारून विजयी सलामीच्या निर्धाराने मैदानात उतरेल. मुख्य आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भलेही फ्रान्स वर्चस्व राखून असेल, परंतु १७ वर्षांखालील स्पर्धांमध्ये फ्रान्सला लौकिकास साजेशी कामगिरी करताना आलेली नाही. मात्र, १७ वर्षांखालील युरो कप स्पर्धेतील यशामुळे यंदा त्यांचा संघ आत्मविश्वासाने भरलेला आहे. २००१ मध्ये विश्वविजेता बनलेल्या फ्रान्सने ५ वेळा उपविजेतेपद पटकावले आहे.जपान लढणार होंडुरासविरुद्ध...आशिया खंडातील मजबूत संघ असा लौकिक असलेला जपान संघ सलामीला होंडुरासविरुद्ध भिडेल. १९९३ मध्ये युवा विश्वचषकाचे यजमानपद सांभाळून पदार्पण केलेल्या जपानने पहिल्याच स्पर्धेत उपांत्यपूृव फेरी गाठली होती. २०११ ची स्पर्धा गाजवताना जपानने अर्जेंटिना, फ्रान्स आणि जमैका या बलाढ्य संघांना मागे टाकत गटविजेतेपद पटकावत खळबळ माजवली होती. काही मैत्री लढती खेळून जपान या स्पर्धेत सहभागी झाली असून या लढतीत त्यांना संभाव्य विजेते मानले जात आहे. दुसरीकडे, होंडुरासने २००७ नंतर नियमितपणे युवा विश्वचषक स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे. २०१३ मध्ये यूएईमध्ये झालेल्या स्पर्धेत होंडुरासने उपांत्यपूृर्व फेरी गाठली होती.मेक्सिकोपुढे इराकचे आव्हान...दोन वेळच्या विजेत्या मेक्सिकोला आपल्या पहिल्याच सामन्यात इराकच्या कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. २००५ मध्ये पहिले विश्वविजेतेपद मिळवल्यानंतर या संघाने सातत्याने आपली छाप पाडली. २०११ मध्ये पुन्हा विश्वविजेतेपद पटकावलेल्या मेक्सिकोने २०१३ मध्ये उपविजेतेपद मिळवले होते. दुसरीकडे, इराकने याआधी केवळ २०१३ मध्ये युवा विश्वचषक स्पर्धेत सहभाग नोंदवला. परंतु, या संघात आश्चर्यकारक निकाल नोंदवण्याची क्षमता असल्याने मेक्सिको इराकला गृहीत धरण्याची चूक करणार नाही. इराकने १६ वर्षांखालील आशिया चषक जिंकून या स्पर्धेतील तिकीट निश्चित केले आहे.‘एफ’ गटस्थळ :सॉल्ट लेक स्टेडियम, कोलकातास्टार इंग्लंडवर नजरा(सायंकाळी ५ वाजता)

टॅग्स :2017 FIFA U-17 World Cupफिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017Footballफुटबॉल