...म्हणून विरुष्काने चार महिन्यांपासून Non-Veg खाल्लेच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2018 14:13 IST2018-10-07T14:13:10+5:302018-10-07T14:13:31+5:30

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा आपल्या फिटनेसची खूप काळजी घेतो.

virat kohli and anushka sharma did not eat non-veg for four months | ...म्हणून विरुष्काने चार महिन्यांपासून Non-Veg खाल्लेच नाही

...म्हणून विरुष्काने चार महिन्यांपासून Non-Veg खाल्लेच नाही

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा आपल्या फिटनेसची खूप काळजी घेतो. त्यामुळेच जगातील सर्वात तंदुरुस्त खेळाडू म्हणून तो ओळखला जातो. मैदानावरही तो अगदी चपळतेने धावा घेतो आणि क्षेत्ररक्षणही करतो. आपल्या फिटनेसमध्ये अधिक सुधारणा करण्यासाठी त्याने आता शाकाहारी बनण्यावर भर दिला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या माहितीनुसार मागील चार महिन्यांपासून कोहलीने मांसाहार (Non-Veg) केलेला नाही. 

त्याला मांसाहार आवडते.. त्याला चिकन बिरयानी आवडते. मात्र त्याने आता शाकाहारी अन्न खाण्यावर भर दिला आहे. तो मागील चार महिने केवळ शाकाहारी जेवण जेवत आहे. शाकाहारी खाल्ल्याने त्याला खूप फायदाही झाला आहे. त्याच्या खेळातही सुधारणा झाली आहे. 

विराटसह त्याची पत्नी अनुष्का शर्मानेही चार महिन्यांपासून मांसाहार केलेला नाही. एका मुलाखतीतही विराटने शाकाहारी बनणे आवडेल असे सांगितले होते. 

Web Title: virat kohli and anushka sharma did not eat non-veg for four months