पोर्तुगाल संघाचा गोलमशीन ख्रिस्तियानो रोनाल्डोनं UEFA Euro Qualifier स्पर्धेत मंगळवारी विक्रमी कामगिरीची नोंद केली. युक्रेन संघाविरुद्धच्या सामन्यात रोनाल्डोनं कारकिर्दीतला 700वा गोल नोंदवला. 

72 व्या मिनिटाला रोनाल्डोनं हा गोल करून विक्रमाला गवसणी घातली, परंतु ब गटातील या सामन्यात पोर्तुगाल संघाला 1-2 असा पराभव पत्करावा लागला. या विजयासह युक्रेननं युरो 2020 स्पर्धेतील स्थान पक्कं केलं.

रोनाल्डोनं 450 गोल हे रेयाल माद्रिदसाठी केले आहेत. त्यानंतर मँचेस्टर युनायटेडसाठी 118, स्पोर्टिंग 7 आणि युव्हेंटस क्लबसाठी 32 गोल केले आहेत. पोर्तुगाल संघासाठी रोनाल्डोनं 95 गोल केले आहेत.

जागतिक फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंत रोनाल्डोनं सहावे स्थान पटकावले आहे.  या विक्रमात पेले ( 767गोल), जोसेफ बिसॅन (805), रोमारिओ ( 772), फेरेंस पुस्कास ( 746) आणि  गेर्ड म्युलर ( 735) हे आघाडीवर आहेत. 

Web Title: Video: Cristiano Ronaldo scores 700th career goal to join legends Pele, Gerd Muller in football's GOAT list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.