Video : गर्लफ्रेंड असावी तर अशी! जगविख्यात खेळाडूला दिलं बर्थ डेचं भारी गिफ्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 17:51 IST2020-02-06T17:51:23+5:302020-02-06T17:51:51+5:30

जगविख्यात फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो यानं 5 फेब्रुवारीला आपला 35वा वाढदिवस साजरा केला

Video : Cristiano Ronaldo given wrapped G-Wagon by stunning girlfriend Georgina Rodriguez for 35th birthday | Video : गर्लफ्रेंड असावी तर अशी! जगविख्यात खेळाडूला दिलं बर्थ डेचं भारी गिफ्ट!

Video : गर्लफ्रेंड असावी तर अशी! जगविख्यात खेळाडूला दिलं बर्थ डेचं भारी गिफ्ट!

जगविख्यात फुटबॉलपटूख्रिस्तियानो रोनाल्डो यानं 5 फेब्रुवारीला आपला 35वा वाढदिवस साजरा केला. जगातील सर्वात श्रीमंत खेळाडू असलेल्या रोनाल्डोनं त्याचा वाढदिवस गर्लफ्रेंड जॉर्जिया रॉड्रीगेज आणि मुलगा ज्युनियर ख्रिस्तियानो यांच्यासोबत साजरा केला. तीन वर्षांपासून 25 वर्षीय जॉर्जिना रॉड्रीगेजला डेट करत आहे. या दोघांनी लवकर लग्न करावे अशी इच्छा रोनाल्डोची आई मारीया डोलोरेस डॉस सांतोस अव्हेइरो यांनी व्यक्त केली होती. आता ते कधी लग्न करतात याची उत्सुकता सर्वांनाच आहे. पण, सध्या चर्चा आहे ती जॉर्जियानं रोनाल्डोला दिलेल्या भारी गिफ्टची..

स्पेनच्या जाका शहरात जन्मलेल्या जॉर्जिनाची आई स्पेनची आहे, तर वडील अर्जेंटिनाचे. लंडनमध्ये शिक्षण घेणाऱ्या जॉर्जिना मॉडलिंग क्षेत्रात येण्यापूर्वी डान्स शिकायची. जॉर्जिनाच्या वडिलांना अमली पदार्थच्या तस्करी प्रकरणी दहा वर्षांचा कारावास झाला होता. 2016मध्ये रोनाल्डोसोबत अनेकदा डेटवर दिसल्यानं ती चर्चेत आली. नोव्हेंबर 2016मध्ये पॅरीस येथील डिजनीलँड येथे रोनाल्डो व जॉर्जिना यांना प्रथम एकत्र पाहिले गेले होते. त्यानंतर हे कपल अनेकदा पब्लिक प्लेसमध्ये फिरताना दिसले.  

रोनाल्डोची प्रेयसी ही ओळख बनण्यापूर्वी जॉर्जिना ही माद्रिद येथे ज्युसी स्टोरमध्ये सेल्स असिस्टन्स म्हणून काम करायची. त्या स्टोरमध्येच रोनाल्डो अन् जॉर्जिना यांच्यात नजरानजर झाली आणि पाहता क्षणीच दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. नोव्हेंबर 2017मध्ये जॉर्जिनानं सुंदर मुलीला जन्म दिला. रोनाल्डो अन् जॉर्जिना यांच्या मुलीचे नाव अॅलेना मार्टिना असे आहे. अॅलेना व्यतिरिक्त या रोनाल्डोची तीन मुलं आहेत. जॉर्जियानं 93 हजार पॉउंडची म्हणजे 85 लाखांची G-Wagon ही कार गिफ्ट केली. या गाडीचा ताशी वेग 136.7mph इतका आहे. तिनं हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आणि त्याला 63 लाखाहून अधिक व्ह्यूवर्सही मिळाले.

Web Title: Video : Cristiano Ronaldo given wrapped G-Wagon by stunning girlfriend Georgina Rodriguez for 35th birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.