Turkish Footballer Cevher Toktas Confesses to Killing 5-year-old Son in Hospital svg | धक्कादायक : फुटबॉलपटूनं स्वतःच्या 5 वर्षांच्या मुलाची केली हत्या 

धक्कादायक : फुटबॉलपटूनं स्वतःच्या 5 वर्षांच्या मुलाची केली हत्या 

कोरोना व्हायरसच्या संकटात  गुरुवारी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 33 वर्षीय फुटबॉलपटूनं स्वतःच्या 5 वर्षांच्या मुलाची हत्या केली. उशीनं मुलाचं तोंड दाबून ही हत्या केल्याचं फुटबॉलपटूनं कबुल केलं. 

टर्कीचा फुटबॉलपटू सीव्हर टोकटास आणि त्याचा मुलगा कॅसीम यांना 23 एप्रिलला खोकला आणि ताप आल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या दोघांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं दिसत असल्यानं त्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर दुसऱ्या दिवशी टोकटासनं अचानक डॉक्टरांना बोलावलं आणि मुलाला श्वास घेण्याचा त्रास होत असल्याचे सांगितले. तेव्हा कॅसीमला ICU मध्ये नेण्यात आले, परंतु त्याचा मृत्यू झाला. वैद्यकिय अधिकाऱ्यांनी कॅसीमचा मृत्यू हा नैसर्गिक असल्याचा अहवाल दिला होता. मुलाच्या मृत्यूच्या 11 दिवसांनंतर टोकटासनं खून केल्याचं कबुल केलं. 

टोकटासनं स्वतःला कॅर्सी पोलीस स्थानकात अटक करून घेतले. तो म्हणाला,''मला कॅसीम आवडत नव्हता आणि म्हणून मी त्याची हत्या केली. तो पोटावर झोपला असताना मी उशीनं त्याचं डोकं 15 मिनिटांपर्यंत दाबून ठेवलं. तेव्हा त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याची हालचाल थांबल्यानंतर मी उशी काढली आणि डॉक्टरांना मदतीसाठी आवाज दिला.''  

''जन्मल्यापासून मी त्याचा तिरस्कार करायचो. मला तो का आवडत नाही, हेही कळतं नव्हतं. न आवडणे, हे एकच कारण होतं आणि मी त्याचा खून केला. मला कोणताही मानसिक आजार नाही,''असंही तो म्हणाला. 
 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

मोहम्मद शमीला पत्नी हसीन जहाँमुळे मोठा धक्का; यंदाही मिळणार नाही अर्जुन पुरस्कार 

Photos : विराट-अनुष्काचे मुंबईतील घर पाहिलेत का? चला करूया सफर!

 जगायचं तरी कसं? लॉकडाऊनमुळे महाराष्ट्राच्या खेळाडूवर उपासमारीची वेळ

हार्दिक पांड्याच्या रोमँटिक उत्तरानं नताशा लाजली; TikTok व्हिडीओतून व्यक्त केल्या भावना

Video : डोळ्यावर पट्टी बांधलेल्या मुलाचं फुटबॉल कौशल्य पाहा; म्हणाल क्या बात, क्या बात...

Web Title: Turkish Footballer Cevher Toktas Confesses to Killing 5-year-old Son in Hospital svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.