ISLचे वेळापत्रक झालं जाहीर; IND vs PAK वर्ल्ड कप सामन्याच्या दिवशी घेतलीय विशेष काळजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 17:23 IST2023-09-07T17:23:02+5:302023-09-07T17:23:48+5:30
इंडियन सुपर लीग २०२३-२४ फुटबॉलचे वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले. २१ सप्टेंबरपासून आयएसएलच्या १०व्या पर्वाला सुरुवात होणार आहे.

ISLचे वेळापत्रक झालं जाहीर; IND vs PAK वर्ल्ड कप सामन्याच्या दिवशी घेतलीय विशेष काळजी
इंडियन सुपर लीग २०२३-२४ फुटबॉलचे वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले. २१ सप्टेंबरपासून आयएसएलच्या १०व्या पर्वाला सुरुवात होणार आहे. केरळा ब्लास्टर्स विरुद्ध बंगळुरू एफसी यांच्यात सलामीचा सामना कोची येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होणार आहे. दरम्यान आयएसएलचा पहिल्या टप्प्यातील वेळापत्रकच जाहीर करण्यात आले आहे आणि यात भारत-पाकिस्तान यांच्यात वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत होणाऱ्या सामन्यामध्ये क्लॅश होऊ नये याची काळजी घेतली गेली आहे.
आयएसएलचे हे दहावे पर्व आहे आणि आयएसएल ही डिजिटल आणि लिनियर टीव्ही प्लॅटफॉर्मवर भारतातील सर्वोच्च फुटबॉल लीग आहे. यावेळी Viacom18 ने थेट प्रक्षेपणाचे हक्क जिंकले असून JioCinema वर देखील ते विनामूल्य प्रसारित केले जातील. २३ ऑक्टोबरपासून आशियाई स्पर्धा होणार आहे आणि यात भारताचा फुटबॉल संघही यावेळी सहभाग घेणार आहे.
SAVE THE DATES! 📅
— Bengaluru FC (@bengalurufc) September 7, 2023
The Blues begin their ISL 2023-24 campaign on the road, with clashes against Kerala Blasters and Mohun Bagan SG. 🔥
Full fixtures below! ⬇️#WeAreBFC#Santhoshakke#ಸಂತೋಷಕ್ಕೆpic.twitter.com/g47vuVtlHo