शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
5
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
6
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
7
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
8
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
9
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
10
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
11
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
12
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
13
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
14
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
15
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
16
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
17
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
18
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
19
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?
20
Google करणार Flipkart सोबत काम, डील जाहीर; आता मंजुरीची प्रतीक्षा

रशियन फुटबॉलची आर्थिक बाजू भक्कम व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 4:01 AM

रोनाल्डो त्याच्या महानतेच्या शर्यतीतील एकमात्र स्पर्धक मेस्सीच्या पुढे आणखी काही पावले पुढे सरकला.

- रणजीत दळवीरोनाल्डो त्याच्या महानतेच्या शर्यतीतील एकमात्र स्पर्धक मेस्सीच्या पुढे आणखी काही पावले पुढे सरकला. त्याचा मोरोक्कोविरुद्धचा सामना जिंकून देणारा एकमात्र गोल त्याच्या धाडशी, स्वत:ला पूर्णपणे झोकून देण्याच्या वृत्तीचा आणखीन एक उत्तम नमुना होता. याबद्दल मेस्सीही कदाचित तक्रार करणार नाही. पुन्हा एकदा आपल्या संघाच्या आक्रमणाची धुरा समर्थपणे सांभाळत रोनाल्डोने स्वत:च्या लौकिकात तर भर टाकलीच; पण आपल्या सहकाऱ्यांनाही आश्वस्त केले. मोरोक्कोनेही तशी कडवी लढत दिली. त्यांनी प्रतिस्पर्ध्यांवर हल्लाबोल केला; पण झियेरव आणि आम्रबात यांना आघाडीच्या फळी साथ दिली नाही. नाही म्हटले तरी बेलहांडाने एका जबरदस्त हेडरवर केलेला जोरादार प्रयत्न पोर्तुगीज गोलरक्षक रुई पॅट्रिसिओने हाणून पाडला. रोनाल्डोचा गोल प्रेक्षणीय की पॅट्रिसिओचा तो सेव्ह? सांगणे कठीण असले, तरी १९७०च्या विश्वचषकातील पेलेचा प्रयत्न हाणून पाडताना इंग्लंडच्या गॉर्डन बँक्सने जी कमाल केली त्या ‘सेव्ह’शी पॅट्रिसिओच्या करामतीची निश्चित तुलना होऊ शकते!या सेव्हमुळे पॅट्रिसिओचे मनोबल, त्याचा आत्मविश्वास वाढेल आणि पोर्तुगीज बचावफळीचा देखील. तसे झाले तर ती त्यांच्या पुढील प्रतिस्पर्ध्यांसाठी निश्चित चांगली बातमी नसेल आणि त्यामध्ये असू शकते रशिया. यजमान आपल्या गटात अव्वल आले किंवा दुसºया स्थानावर त्यांची वाट खडतरच असणार. राउंड आॅफ सिक्स्टीनमध्ये पोर्तुगाल किंवा स्पेनशी मुकाबला म्हणजे वाघाशी नसली, तरी सिंहाशी गाठ!त्याआधी सेंट पीटर्सबर्गमध्ये रशियाची इजिप्तशी गाठ पडली. पाऊस आणि बोचरे वारे अशा स्थितीतही पहिल्यांदाच रशियामध्ये गर्दी दिसली. एका रेस्तराँमध्ये काही रशियन आणि इजिप्शियन चाहते एकत्र खात-पीत असल्याचे बघून बरे वाटले. आपण हुल्लडबाज नाही हे निदान आजपर्यंत तरी सिद्ध करण्यात रशियन ‘फॅन्स’ यशस्वी झाले आहेत. आपला संघ फारशी अपेक्षा नसताना दुसºया फेरीत पोहोचल्याचा आनंद नक्कीच झाला आहे. नव्हे तो ओसंडून वाहतोय. हाच उत्साह कितीसा टिकतो यावर रशियन फुटबॉलची प्रगती अवलंबून आहे.त्यांच्या फुटबॉल व्यवस्थेत अधिक पैसा यायला हवा; पण तो येणार कसा व कोठून? अगदी इंग्लिश लीग, जर्मन बुंडेसलिगा, इटालियन सेरी आ किंवा स्पॅनिश ला लीगा एवढा नसला, तरी येथल्या खेळाला मोठा ‘बूस्ट’ मिळेल एवढा तरी यावा. चेल्सीचे मालक अब्जाधीश रोमन अब्रामोविच हे रशियन आहेत. तसे कोणी रशियन फुटबॉलमध्ये गुंतवणूक करेल? या स्पर्धेमुळे काही रशियन खेळाडूंना काही युरोपियन लीगममध्ये संधी मिळण्याची शक्यता दिसते. आंद्रे आर्शविननंतर असे मोठे नाव किमान क्लब फुटबॉलच्या क्षितिजावर दिसेल? सेंट पीटर्सबर्गच्या भूमीत रशियन फुटबॉलच्या क्रांतीची बीजे खरोखरीच पेरली गेलीत?मॉस्कोच्या तुलनेत लहान असलेले पीटर्सबर्ग बरेच प्रगत आहे. जुनी राजधानी नव्या राजधानीपेक्षा अधिक प्रगत वाटली. येथले लोक अधिक उत्साही वाटले, त्यांची लगबग डोळ्यात भरण्यासारखी. रस्त्यांवर, सार्वजनिक ठिकाणी वर्दळही अधिक दिसली. दोन दिवसांपूर्वी सलर पॅलेस पाहून परत येताना बस वेळेवर मिळाली खरी; पण पूर्ण ४० मिनिटांचा प्रवास मात्र उभ्यानेच करावा लागला. ट्रॅम आणि मेट्रोही बºयापैकी भरलेल्या होत्या. सेंट पीटर्सबर्गचे दोन - तीन वेळा नामकरण झाले आहे. प्रथम पेट्रोग्राड व लेनिनच्या राजवटीत लेनिनग्राड; पण १९९०च्या दशकात पुन्हा सेंट पीटर्सबर्ग! राजवट बदलली, नाव बदलले; पण प्रगती मात्र होतच राहिली.