सेविला चॅम्पियन्स लीगमध्ये स्थान मिळविण्याच्या समीप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 00:31 IST2020-07-14T00:30:25+5:302020-07-14T00:31:30+5:30

सेविला संघ चौथ्या स्थानावरील आपला दावा पक्का करण्यापासून केवळ एक अंक दूर आहे. युरोपातील अव्वल क्लब स्पर्धा चॅम्पियन्स लीगमध्ये अव्वल चार स्थानांवरील संघ सहभागी होतात.

Sevilla are close to securing a place in the Champions League | सेविला चॅम्पियन्स लीगमध्ये स्थान मिळविण्याच्या समीप

सेविला चॅम्पियन्स लीगमध्ये स्थान मिळविण्याच्या समीप

माद्रिद : सेविलाने मालोर्काचा २-० ने पराभव कीरत स्पॅनिश फुटबॉल लीग ला लिगामध्ये आपला सलग चौथा विजय नोंदवला. त्यामुळे त्यांनी पुढील मोसमातील चॅम्पियन्स लीगसाठी पात्रता मिळविण्याच्या दिशेने वाटचाल केली. फॉरवर्ड लुकास ओकामपोस व युसूफ एन. नेसेरी यांनी सेविलातर्फे गोल नोंदवले.
सेविला संघ चौथ्या स्थानावरील आपला दावा पक्का करण्यापासून केवळ एक अंक दूर आहे. युरोपातील अव्वल क्लब स्पर्धा चॅम्पियन्स लीगमध्ये अव्वल चार स्थानांवरील संघ सहभागी होतात.
सेविलाचे सध्या बलाढ्य एटलेटिको माद्रिद संघाप्रमाणे समान ६६ गुण आहेत, पण गोल फरकामुळे ते चौथ्या स्थानी आहेत. पाचव्या स्थानावरील विल्लारीयाल संघाच्या तुलनेत सेविला संघ ९ गुणांनी आघाडीवर आहे आणि एक गुण मिळविल्यानंतर स्पर्धेतील त्यांचे किमान चौथे स्थान निश्चित होईल. (वृत्तसंस्था)

Web Title: Sevilla are close to securing a place in the Champions League