Serie A: Parachutist gatecrashes Inter Milan’s win at Sassuolo - Watch video | Video : सामना सुरू असताना पॅराशूटनं 'ती' थेट मैदानावर उतरली अन् झाली पळापळ 
Video : सामना सुरू असताना पॅराशूटनं 'ती' थेट मैदानावर उतरली अन् झाली पळापळ 

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा कसोटी सामना रांचीत सुरू आहे. कसोटीच्या दुसऱ्या दिवशी एक चाहता सुरक्षाभिंत ओलांडून थेट मैदानात घुसला होता. या चाहत्यानं आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकचे पाय पकडले.. त्यानंतर सुरक्षारक्षक धाव घेत त्याला मैदानाबाहेर नेले. विशेष म्हणजे त्या चाहत्याची चप्पल मैदानावर सुटली आणि आफ्रिकेच्या खेळाडूंनी स्वतःच्या हातानं ती उचलून चाहत्याच्या दिशेनं भिरकावली. या सर्व प्रसंगानं क्रिकेट चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन झाले. असाच एक चाहती चक्क पॅराशूटनं सामना सुरू असताना मैदानावर उतरली होती, हे तुम्हाला सांगितले तर पटणार नाही. पण, असा प्रकार खरचं घडला आहे आणि त्यानंतर सुरक्षारक्षकांची चांगलीच पळापळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

टेंशन घेऊ नका भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यात असं काही घडलेलं नाही. सीरी ए फुटबॉल लीगमधील हा प्रसंग आहे. सासौलो आणि इंटर मिलान यांच्यात इटलीत झालेल्या सामन्यात चाहतीनं चक्क पॅराशूटनं मैदानावर लँडींग केले. त्यामुळे काही काळासाठी सामना थांबवण्यात आला होता. इंटर मिलानचा स्ट्रायकर रोमेलू लुकाकू याने पेनल्टी घेतल्यानंतरच त्वरित ही घटना घडली. इंटर मिलानने हा सामना 4-3 असा जिंकला. पॅराशूटनं ती मैदानावर उतरल्यानंतर त्वरित सुरक्षारक्षकांनी तिच्याकडे धाव घेतली. 

पाहा व्हिडीओ...


 

Web Title: Serie A: Parachutist gatecrashes Inter Milan’s win at Sassuolo - Watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.