२५० कोटी रुपये घेतले पण, राज्यात आलेच नाहीत, मेसीवर केरळम सरकार करणार कायदेशीर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 18:06 IST2026-04-02T18:05:18+5:302026-04-02T18:06:05+5:30
Lionel Messi News: जागतिक फुटबॉलमधील दिग्गज संघ असलेला अर्जेंटिना आणि सध्याच्या महान फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी याच्यावर केरळमचे क्रीडामंत्री व्ही अब्दुरहीमान यांनी गंभीर आरोप केले आहेत.

२५० कोटी रुपये घेतले पण, राज्यात आलेच नाहीत, मेसीवर केरळम सरकार करणार कायदेशीर कारवाई
जागतिक फुटबॉलमधील दिग्गज संघ असलेला अर्जेंटिना आणि सध्याच्या महान फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी याच्यावर केरळमचे क्रीडामंत्री व्ही अब्दुरहीमान यांनी गंभीर आरोप केले आहेत. लियोनेल मेस्सी आणि त्याच्या अर्जेंटिनाच्या फुटबॉल संघाने केरळम राज्याची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अर्जेंटिनाच्या संघाने केरळममध्ये खेळण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र त्यांनी नंतर शब्द फिरवला, असा आरोप त्यांनी केला.
अब्दुरहिमान यांनी सांगितले की, अर्जेंटिनाच्या संघाने केरळमध्ये येऊन एक सामना खेळावा अशी आमची इच्छा होती. त्यासाठी आम्ही चर्चेच्या अनेक फेऱ्या घेतल्या. प्रायोजक जमवण्यासाठी मेहनत घेतली. तसेच आंतरराष्ट्री संघाला देण्यासाठी सुमारे २५० कोटी रुपयांची व्यवस्था करणं सोपं नव्हतं.
ते पुढे म्हणाले की, आम्ही पूर्ण तयारी केली होती. मात्र पैसे घेतल्यानंतरही हा संघ आलाच नाही. ही आमची फसवणूक आहे. असं काही होईल, याची आम्ही कल्पना केली नव्हती.अर्जेंटिनाच्या संघाने अशा प्रकारे पाच इतर देशांनाही फसवल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडूनही त्यांनी पैसे घेतले मात्र खेळायला गेलेच नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.