रोनाल्डो-मेस्सी लढत हुकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 05:42 IST2024-02-02T05:42:23+5:302024-02-02T05:42:36+5:30

Football: जगातील सर्वच फुटबाॅलप्रेमींना ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांच्या लढतीची उत्सुकता असते. इंटर मियामी आणि अल नासर या मैत्रीपूर्ण सामन्याच्या माध्यमातून दोन्ही दिग्गज आमनेसामने येणार होते; पण दुखापतीमुळे रोनाल्डो या सामन्यात खेळू शकणार नाही.

Ronaldo-Messi fight will be lost | रोनाल्डो-मेस्सी लढत हुकणार

रोनाल्डो-मेस्सी लढत हुकणार

रियाद : जगातील सर्वच फुटबाॅलप्रेमींना ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांच्या लढतीची उत्सुकता असते. इंटर मियामी आणि अल नासर या मैत्रीपूर्ण सामन्याच्या माध्यमातून दोन्ही दिग्गज आमनेसामने येणार होते; पण दुखापतीमुळे रोनाल्डो या सामन्यात खेळू शकणार नाही. त्यामुळे जगभरातील चाहत्यांची निराशा झाली आहे.

रोनाल्डोचा क्लब अल नासर आणि मेस्सीचा इंटर मियामी यांच्यात गुरुवारी रात्री सामना होणार आहे. अल नासरचे लुईस कास्ट्रो यांनी सांगितले की, ख्रिस्तियानो पूर्णपणे तंदुरुस्त नाही. तो पुढील काही दिवसांत तंदुरुस्त होईल. तो इंटर मियामीविरुद्ध खेळणार नाही. 

मेस्सी आणि रोनाल्डो यांच्यातील चुरस स्पेनमध्ये बार्सिलोना आणि रियल माद्रिद या संघांकडून खेळताना सुरू झाली होती. दोघांनी मागील १५ पैकी १३ बॅलन डिओर पुरस्कार जिंकले आहेत.

Web Title: Ronaldo-Messi fight will be lost