Messi was the best player I ever had - Cristiano Ronaldo | मेस्सीमुळे मी उत्कृष्ट खेळाडू झालो - ख्रिस्तियानो रोनाल्डो

मेस्सीमुळे मी उत्कृष्ट खेळाडू झालो - ख्रिस्तियानो रोनाल्डो

लिस्बन : लिओनेल मेस्सीसह गेल्या अनेक वर्षांपासून सिरु असलेल्या स्पर्धेमुळे मी उत्कृष्ट खेळाडू बनलो. अर्जेटिनाच्या या स्टार खेळाडूसह सुरु असलेल्या या स्पर्धेचा मी मनापासून आनंद घेत आहे,’ असे पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने म्हटले. त्याचप्रमाणे, ‘मी आणि मेस्सी कधीही एकत्र फिरत नाही,’ असेही रोनाल्डोने म्हटले.
पोर्तुगालमध्ये एका वृत्तवाहिनीसह चर्चा करताना रोनाल्डो म्हणाला की, ‘मेस्सीने मिळवलेल्या यशाचा आणि त्याने केलेल्या रेकॉर्डचा मला आदर आहे. मी स्पेन सोडल्याने त्याने आपली निराशा जाहीरपणे व्यक्त केली होती. कारण, या स्पर्धेचा त्यालाही आनंद होता. तो देखील आमच्या दोघांमधील स्पर्धेचा आनंद घेत होता. ही एक चांगली स्पर्धा आहे, पण शानदार नाही.’
इतर खेळांमधील स्पर्धांचे उदारहण देताना रोनाल्डो म्हणाला की, ‘दिग्गज खेळाडू मायकल जॉर्डन याचेही बास्केटबॉलमध्ये अनेक प्रतिस्पर्धी होते. फॉर्म्युला वनमध्ये एर्टन सेना आणि अ‍ॅलेन प्रोस्ट यांच्यातील स्पर्धा जबरदस्त होती. या सर्व स्पर्धा खिलाडूवृत्तीच्या होत्या. आमच्यामध्येही अशीच चांगली स्पर्धा आहे. त्यामुळेच मेस्सीने मला आणि मी त्याला उत्कृष्ट खेळाडू बनविले.’ त्याचप्रमाणे, ‘आमच्यात चांगल्या प्रकारचे व्यावसायिक संबंध राहिले आहे. आम्ही कधीही एकत्रपणे जेवलो नाही, पण भविष्यात एकत्रितपणे जेवू शकतो. यामध्ये अडचण काय?,’ असेही रोनाल्डो म्हणाला. (वृत्तसंस्था)

Web Title: Messi was the best player I ever had - Cristiano Ronaldo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.