रोहित नाईक नवी मुंबई : एकहाती वर्चस्व राखलेल्या माली संघाने तुर्कीचा ३-० असा धुव्वा उडवत १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेच्या ‘ब’ गटात विजयी मार्ग पकडला. सलामीला मालीला पॅराग्वेविरुद्ध थोडक्यात हार पत्करावी लागली होती.नेरूळ येथील डॉ. डी. वाय. स्टेडियमवर मालीने तुर्कीविरुद्ध गोलचा वर्षाव केला. ३८व्या मिनिटाला जेमैसा ट्राओरे याने अप्रतिम गोल करून मालीला १-० असे आघाडीवर नेले. ६८व्या मिनिटाला गोलपोस्टला लागून परत आलेल्या चेंडूवर ताबा मिळवित लसानाने गोल नोंदविला. ८६व्या मि. फोड कोनाटे याने तिसरा गोल केला.पॅराग्वेची बाद फेरी जवळपास निश्चितपॅराग्वेने ‘ब’ गटातून सलग दुसºया विजयाची नोंद करीत बाद फेरीतील प्रवेश निश्चित करत दुबळ्या न्यूझीलंडला ४-२ असे नमवले. विशेष म्हणजे, सामन्यातील पाचही गोल पॅराग्वेकडून झाले. पॅराग्वेचा कर्णधार अॅलेक्सिस डुआर्टे याने दोन स्वयंगोल केल्यानंतरही न्यूझीलंड पराभूत झाले. सामन्यातील दुसºयाच मिनिटाला अॅलन रॉड्रिग्जने फ्री किकवर शानदार गोल करताना चेंडू थेट गोलजाळ्यात धाडला. यानंतर, डुआर्टेकडून दोन स्वयंगोल झाल्याने न्यूझीलंडने २-१ अशी आघाडी घेतली. परंतु, दुसºया सत्रात पॅराग्वेने चित्र पालटले.
मालीचा धडाकेबाज विजय : तुर्कीचा ३-०ने धुव्वा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 01:29 IST