माद्रिदला माझ्यापासून फक्त पैसा कमवायचा होता, रोनाल्डोचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 15:36 IST2018-10-30T15:23:01+5:302018-10-30T15:36:46+5:30
रेयाल माद्रिदला सोडचिठ्ठी देण्यामागचे खरे कारण दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने सांगितले.

माद्रिदला माझ्यापासून फक्त पैसा कमवायचा होता, रोनाल्डोचा गौप्यस्फोट
माद्रिद : रेयाल माद्रिदला सोडचिठ्ठी देण्यामागचे खरे कारण दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने सांगितले. माद्रिदचे अध्यक्ष फ्लोरेंटीनो पेरेझ यांना माझ्या नावाचा वापर करून फक्त पैसा कमवायचा होता. ते फक्त माझ्याकडे व्यवसाय संबंधातून पाहायचे आणि मला ते माहित होते. त्यामुळे मी माद्रिद सोडल्यानंतर त्यांनी जो काही भावनिक आव आणला तो मनापासून नव्हता, असा गौप्यस्फोट रोनाल्डोने फ्रान्स फुटबॉलला दिलेल्या एका मुलाखतीत केला.
Can you guess where am I?#pestanacr7#cr7@PestanaCR7pic.twitter.com/ilWCjCZ6Qi
— Cristiano Ronaldo (@Cristiano) October 29, 2018
रोनाल्डोने माद्रिदला चॅम्पियन्स लीग स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा जेतेपद जिंकून दिले. तरिही त्याने माद्रिदला सोडचिठ्ठी देऊन युव्हेंटस क्लबशी करार केला. तो म्हणाला,''माद्रिदला माझी गरज नव्हती, असे मला मनापासून वाटत होते. विशेषतः अध्यक्ष सुरुवातीला जसे माझ्याशी वागायचे त्यात बराच बदल झाला होता.''
— Cristiano Ronaldo (@Cristiano) October 29, 2018
''त्यामुळेच मी क्लब सोडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी मला क्लब सोडण्यास सांगितल्याच्या बातम्या कानावर येत होत्या. त्यात तथ्य नव्हते. अध्यक्षांचा व्यवसायिक दृष्टीकोन या निर्णयाला कारणीभूत आहे. चिनमध्ये मला आता मिळालेल्या रकमेपेक्षा पाचपट रक्कम मिळाली असती. पण, मी तसे केले नाही. मी पैशांसाठी युव्हेंटसमध्ये गेलेलो नाही,'' असेही रोनाल्डोने सांगितले.