शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 12:50 IST2025-12-17T12:49:44+5:302025-12-17T12:50:23+5:30
Lionel Messi In Vantara: अर्जेंटिनाचा आघाडीचा फुटबॉलपटू लियोनेल मेसी सध्या भारत दौऱ्यावर आहे. तसेच या दौऱ्यादरम्यान तो विविध शहरांना भेटी देत आहे. यादरम्यान, लियोनेल मेसी याने मंगळवारी संध्याकाळी अनंत अंबानी यांच्या गुजरातमधील ‘वनतारा’ला भेट दिली.

शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
अर्जेंटिनाचा आघाडीचा फुटबॉलपटू लियोनेल मेसी सध्या भारत दौऱ्यावर आहे. तसेच या दौऱ्यादरम्यान तो विविध शहरांना भेटी देत आहे. यादरम्यान, लियोनेल मेसी याने मंगळवारी संध्याकाळी अनंत अंबानी यांच्या गुजरातमधील ‘वनतारा’ला भेट दिली. यावेळी मेसीने देवांची पूजा केली. तसेच वनतारामधील वन्यप्राणी पाहिले. यावेळी अनंत अंबानी आणि त्यांच्या पत्नी राधिका अंबानी हेसुद्धा उपस्थित होते.
वनताराला दिलेल्या भेटीवेळी लियोनेल मेसी हा पूर्णपणे भारतीय संस्कृती आणि परंपरेच्या स्टाईलमध्ये दिसला. तसेच मेसीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले तेव्हा ते फॅन्सच्या खूप पसंतीस उतरले आहेत. वनतारामध्ये आलेल्या लियोनेल मेसीची ड्रेसिंग सेमी कॅज्युअल आणि क्लासी मिनिमलिज्मची मिक्सचर होती. त्याने नेव्ही ब्लू रंगाचं ब्लेझर आणि मॅचिंग पँट परिधान केली होती. तसेच आतमध्ये पांढऱ्या रंगाचं टीशर्ट परिधान केलं होतं. त्यामुळे त्याचा लूक फ्रेश आणि टाइमलेस बनला होता.
दरम्यान, लियोनेल मेसी याने वनतारा येथील मंदिरात जाऊन पूजाही केली. पूजा आणि आरती करताना मेसीने पायातील चपला काढून ठेवल्या होत्या. तसेच डोक्यावर टिळाही लावला होता. दरम्यान, पूजेनंतर त्याने काही फोटोही काढून घेतले. त्यावेळी मेसीच्या गळ्यात रुद्राक्षांची माळाही होती. त्यानंतर लियोनेल मेसीने वनतारामध्ये फेरफटका मारून वन्यप्राणी पाहिले. तसेच तिथे उपस्थित असलेल्या लोकांसोबत गप्पाही मारल्या.