शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

'हा' फुटबॉलपटू ठरला फ्रान्सचा 'कबीर खान'; धडाकेबाज भाषणाने खेळाडूंमध्ये जागवला विजयाचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 3:54 PM

फुटबॉल विश्वचषक विजेत्या फ्रान्सच्या संघातही असाच एक ' कबीर खान ' आहे आणि त्याच्या प्रेरणादायी भाषणामुळेच फ्रान्स संघाने विश्वचषक जिंकला..

नवी दिल्ली - ' सत्तर मिनट, सत्तर मिनट है तुम्हारे पास, शायद तुम्हारे जिन्दगी की सबसे खास सत्तर मिनिट; आज तुम अच्छा खेलो या बुरा, ये सत्तर मिनिट तुम्हे जिन्दगी भर याद रहेंगे !' चक दे इंडिया या चित्रपटातील प्रशिक्षक कबीर खान यांचा हा  डायलॉग कानावर पडला की शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते... फुटबॉल विश्वचषक विजेत्या फ्रान्सच्या संघातही असाच एक ' कबीर खान ' आहे आणि त्याच्या प्रेरणादायी भाषणामुळेच फ्रान्स संघाने विश्वचषक जिंकला.. असे तुम्हाला सांगितले तर खरे वाटणार नाही, पण हे खरे आहे. मॉस्कोच्या ल्युझनियाकी स्टेडियमवर रविवारी झालेल्या लढतीत फ्रान्सने 4-2 अशा फरकाने क्रोएशियाला नमवून विश्वचषक उंचावला. 1998 नंतर त्यांनी हा पराक्रम केला. जेतेपदानंतर फ्रान्स खेळाडूंच्या विजयाचा जल्लोष सर्वांनी पाहिला. मात्र आता एक नवा व्हिडीओ समोर आला आहे आणि तो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बाद फेरीतील अर्जेंटिनाविरूद्धच्या लढतीचा आहे. यामध्ये फ्रान्सचा प्रमुख खेळाडू पॉल पोग्बा संपूर्ण जोशात आपल्या सहका-यांना प्रेरणादायी भाषण देत आहे. बाद फेरीच्या सामन्यात फ्रान्सने 4-3 अशा फरकाने गतउपविजेत्या अर्जेंटिनाचा पराभव केला होता. पॉल पोग्बा असे काय म्हणाला होता ? मला मैदानावर आज सैनिकांना पाहायचे आहे. निराश चेह-याने आपल्याला घरी जायचे नाही. विजयाच्या आनंदात मला बेधुंद व्हायचे आहे. त्यामुळे मैदानावर सर्वांनी स्वत:ला झोकून द्यावे अशी माझी इच्छा आहे. मला मैदानावर सैनिक हवे आहेत. समोर मेस्सी असो किंवा अन्य कुणी आम्हाला त्याची पर्वा नाही. आम्हाला हा विश्वचषक जिंकायचा आहे.  पाहा पोग्बाचा हा व्हिडीओ... 

 

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Franceफ्रान्सFootballफुटबॉलSportsक्रीडा