हे काय नवलंच...! महिला रेफरीचे पाय दिसू नये म्हणून इराणनं LIVE फुटबॉल सामन्यात लढवली अनोखी शक्कल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 04:07 PM2021-04-16T16:07:19+5:302021-04-16T16:08:49+5:30

टॉटेनहॅम हॉटस्पूर विरुद्ध मँचेस्टर युनायटेड यांच्यातल्या इंग्लिश प्रीमिअर लीगमधील सामन्यात इराणमध्ये अनोखे चित्र पाहायला मिळाले.

Iranian TV slammed for interrupting football to prevent fans seeing female referee’s legs | हे काय नवलंच...! महिला रेफरीचे पाय दिसू नये म्हणून इराणनं LIVE फुटबॉल सामन्यात लढवली अनोखी शक्कल

हे काय नवलंच...! महिला रेफरीचे पाय दिसू नये म्हणून इराणनं LIVE फुटबॉल सामन्यात लढवली अनोखी शक्कल

Next

टॉटेनहॅम हॉटस्पूर विरुद्ध मँचेस्टर युनायटेड यांच्यातल्या इंग्लिश प्रीमिअर लीगमधील सामन्यात इराणमध्ये अनोखे चित्र पाहायला मिळाले. इराणमध्ये महिलांना संपूर्ण शरीर झाकले जातील असे वस्त्र घालणे बंधनकारक आहे, त्यात फुटबॉल सामन्यात सहाय्यक रेफरी सिएन मॅसी-एलीस ही टीशर्ट व शॉर्ट्सवर होती. त्यामुळे जेव्हा जेव्हा तिच्याकडे कॅमेरा जायचा, तेव्हा इराणमध्ये स्टेडियमचा बर्ड व्ह्यू दाखवला जात होता. त्यामुळे संपूर्ण जगाला ती रेफरी दिसत असताना इराणमध्ये स्टेडियम दिसत होते.

महिला रेफरीचे पाय दिसता कामा नये, याकरीता हा निर्णय घेतला गेल्याचे My Stealthy Freedom या इराणीयन महिलांच्या ग्रुपनं म्हटले.  २०१८मध्ये इराणीयन स्टेट टीव्ही चॅनलने चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या बार्सिलोनाविरुद्धच्या लढतीत महिला रेफरीचे पाय दिसू नये म्हणून तेवढा भाग ब्लर केला होता. 

मँचेस्टर युनायटेडनं ३-१ अशा फरकानं हा सामना जिंकला. फ्रेड ( ५७ मि.), एडिन्सन कव्हानी ( ७९ मि.) व मॅसोन ग्रीनवूड ( ९०+६ मि.) यांनी गोल केले. 
 

Web Title: Iranian TV slammed for interrupting football to prevent fans seeing female referee’s legs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.