शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
3
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
4
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
5
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
6
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
7
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
8
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
9
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
10
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
11
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
12
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
13
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
14
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
15
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
16
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
17
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
18
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
19
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
20
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले

EURO 2020 : जर्मनीविरुद्धच्या सामन्यात सहकाऱ्यांनीच दिला ख्रिस्तियानो रोनाल्डोला दगा; पोर्तुगालचा पराभव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 4:09 PM

यूरो फुटबॉल स्पर्धेत गतविजेत्या पोर्तुगाल संघाला शनिवारी धक्कादायक पराभव पत्करावा लागला.

यूरो फुटबॉल स्पर्धेत गतविजेत्या पोर्तुगाल संघाला शनिवारी धक्कादायक पराभव पत्करावा लागला. ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पोर्तुगाल संघाला जर्मनीकडून 2-4 अशी हार पत्करावी लागली. जर्मनीला विजयासाठी पोर्तुगालच्याच खेळाडूंनी मदत केल्यानं रोनाल्डोला मोठा धक्का बसला. रॉबिन गोसेन्स आणि काय हव्हर्ट्ज यांनी गोल करून जर्मनीचा 4-2 असा विजय पक्का केला.  

ख्रिस्तियानो रोनाल्डो व डिओगो जोटा यांनी पोर्तुगालसाठी गोल केले, परंतु दोन रुबेन डायस व राफेल गुरेईरो यांच्यामुळे जर्मनीच्याच गोलजाळीत चूकून चेंडू गेला. त्या दोन स्वयंगोलमुळे पोर्तुगाल संघाला 2-4 असा पराभव पत्करावा लागला.  या सामन्यात जर्मनीनं दणक्यात सुरूवात केली होती. गोसेन्स यानं पाचव्या मिनिटाला गोल केला, परंतु VAR रिव्ह्यूत तो ऑफसाईड असल्याचे दिसले अन् तो गोल नाकारण्यात आला. दहा मिनिटांनंतर रोनाल्डोनं पोर्तुगालचे खाते उघडले. या गोलसह रोनाल्डोनं सर्वाधिक 109 आंतरराष्ट्रीय गोल असलेल्या इराणच्या अली डाईल यांच्या विक्रमाशी बरोबरी केली.  पण, 35 व 39 मिनिटांच्या या कालावधीत पोर्तुगालच्या खेळाडूंनी जर्मनीला दोन गोल भेट म्हणून दिले अन् जर्मनीनं पहिल्या हाफमध्ये 2-1 अशी आघाडी घेतली. 51व्या मिनिटाला कायनं व 60व्या मिनिटाला रॉबिननं जर्मनीची आघाडी 4-1 अशी मजबूत केली. 67व्या मिनिटाला जोटानं गोल करून पोर्तुगालला दिलासा दिला, परंतु पोर्तुगालला पराभव टाळता आला नाही. F गटात जर्मनी व पोर्तुगाल प्रत्येकी 3 गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. फ्रान्स 4 गुणांसह अव्वल स्थानी आहे. आता पोर्तुगालला अखेरच्या साखळी सामन्यात फ्रान्सवर विजय मिळवून बाद फेरीत प्रवेश करण्याची संधी आहे.  

 

टॅग्स :Cristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डोPortugalपोर्तुगालGermanyजर्मनी