गोल होताच धावत-धावत गर्लफ्रेंडकडे गेला, पंचांनी दणकाच दिला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 13:14 IST2018-10-31T13:14:36+5:302018-10-31T13:14:53+5:30

फुटबॉल हा फुल ऑफ एनर्जीचा खेळ मानला जातो.. त्यामुळेच गोल केल्यानंतर खेळाडू बेभान होऊन जल्लोष करतात.

Footballer celebrates his goal by proposing to girlfriend | गोल होताच धावत-धावत गर्लफ्रेंडकडे गेला, पंचांनी दणकाच दिला!

गोल होताच धावत-धावत गर्लफ्रेंडकडे गेला, पंचांनी दणकाच दिला!

चिली : फुटबॉल हा फुल ऑफ एनर्जीचा खेळ मानला जातो.. त्यामुळेच गोल केल्यानंतर खेळाडू बेभान होऊन जल्लोष करतात. प्रत्येक खेळाडू त्याच्या आनंद साजऱ्या करण्याच्या वेगवेगळ्या शैलीमुळे ओळखला जातो. पण, गोल करण्याचा आनंद साजरा करण्यासाठी एखाद्या खेळाडूने चक्क गर्लफ्रेंडला प्रपोज केला, असे सांगितले तर पटणार नाही. मात्र, हे खरं आहे. चिलियन प्रीमिअर डिव्हिजन फुटबॉल सामन्यात एका गोल केल्याचा आनंद असा साजरा केला.

सी.डी. अँटोफागास्टा आणि एव्हर्टन यांच्यातील सामन्यात अँटोफागास्टाच्या एडुअर्ड बेलो याने गोल केल्यानंतर प्रेक्षकांमध्ये धाव घेतली. तेथे उपस्थित असलेल्या गर्लफ्रेंड गॅब्रीएला ब्रिटोला त्याने अंगठी घालत प्रपोज केलं. गॅब्रीएला ही व्हॉलीबॉलपटू आहे. गॅब्रीएलानेही त्वरित होकार कळवला आणि प्रेक्षकांनी टाळ्या वाजवत दोघांचे अभिनंदन केले. मात्र, पंचांनी बेलोला पिवळे कार्ड दाखवून ताकीद दिल्याने प्रेक्षकांना हसू आवरले नाही. 
पाहा हा व्हिडीओ... 

 

Web Title: Footballer celebrates his goal by proposing to girlfriend