शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

विश्वचषक पात्रता स्पर्धा; ‘त्या’ वादग्रस्त गोलची चौकशी करा! भारतीय फुटबॉल महासंघाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 06:25 IST

Football World Cup Qualifiers: कतारविरुद्ध मंगळवारी दोहा येथे भारतीय संघ फिफा विश्वचषक फुटबॉलच्या पात्रता फेरीच्या निर्णायक सामन्यात १-२ ने पराभूत झाला. सामन्यादरम्यान दक्षिण कोरियाचे रेफ्री किम वू सुंग यांनी एक वादग्रस्त गोल यजमान संंघाच्या बाजूने योग्य ठरविला होता.

नवी दिल्ली - कतारविरुद्ध मंगळवारी दोहा येथे भारतीय संघ फिफा विश्वचषक फुटबॉलच्या पात्रता फेरीच्या निर्णायक सामन्यात १-२ ने पराभूत झाला. सामन्यादरम्यान दक्षिण कोरियाचे रेफ्री किम वू सुंग यांनी एक वादग्रस्त गोल यजमान संंघाच्या बाजूने योग्य ठरविला होता. याविरुद्ध अखिल भारतीयफुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) अध्यक्ष कल्याण चौबे यांनी बुधवारी सविस्तर तपास करण्याची मागणी केली. 

‘संबंधित अधिकाऱ्यांनी या अन्यायावर तोडगा काढावा,’ असे चौबे म्हणाले. ते पुढे म्हणाले, ‘जय- पराजय खेळाचा भाग आहेत. आम्ही तो नम्रपणे स्वीकारतो. पण कालच्या गोलवर बराच वाद झाला. यामुळे २०२६ च्या स्पर्धेसाठी भारत तिसऱ्या पात्रता फेरीपासून वंचित राहणार आहे. अन्यायाविरुद्ध मी फिफा पात्रता फेरी प्रमुख, एएफसी रेफ्री समिती प्रमुख व सामना आयुक्तांना रेफ्रीच्या गंभीर चुकीबाबत लिहिले. सर्वांनी वादग्रस्त गोलची चौकशी करायला हवी. फिफा व एएफसी योग्य पाऊल उचलतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे.’

नेमके काय घडले...७३ व्या मिनिटाला अब्दुल्लाह अलाहरकच्या फ्री किकवर युसेफ आयमेन याने हेडरचा प्रयत्न केला. हा प्रयत्न भारतीय कर्णधार व गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधूने हाणून पाडला. यावेळी गुरप्रीत खाली पडला, तर चेंडू मैदानाबाहेर गेला. हाशमी हुसेनने किक मारून चेंडू पुन्हा मैदानात आणला. त्यावर आयमेनने गोल नोंदविला. गुरप्रीतचा संपर्क झाल्यानंतर चेंडू मैदानाबाहेर गेल्यामुळे खेळ थांबवून कतारला कॉर्नर किक मिळणे अपेक्षित होते. पण रेफ्रीने असे केले नाही.

नियम काय सांगतो...नियमानुसार चेंडू ‘गोल लाइन किंवा टचलाइन’पासून बाहेर गेल्यास मैदानाबाहेर गेल्याचे मानले जाते. भारतीय संघाचे ५६ वर्षांचे मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमक यांनी हा निर्णय पक्षपाती असल्याची टीका केली. हा अन्याय असून यामुळे आमचा स्वप्नभंग झाला, असेही ते म्हणाले. कर्णधार गुरप्रीतनेही रेफ्रीचा हा निर्णय अतिशय दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :FootballफुटबॉलIndiaभारतQatarकतार