ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या घड्याळाची किंमत ऐकून येईल चक्कर, मुंबईत खरेदी कराल एक घर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 15:33 IST2020-01-08T15:31:56+5:302020-01-08T15:33:34+5:30
जगातील अव्वल फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोनं मंगळवारी युव्हेंटस क्बलकडून हॅटट्रिक नोंदवताना नववर्षाची दणक्यात सुरुवात केली.

ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या घड्याळाची किंमत ऐकून येईल चक्कर, मुंबईत खरेदी कराल एक घर
जगातील अव्वल फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोनं मंगळवारी युव्हेंटस क्बलकडून हॅटट्रिक नोंदवताना नववर्षाची दणक्यात सुरुवात केली. रोनाल्डोच्या हॅटट्रिकच्या जोरावर युव्हेंटस क्लबनं 4-0 अशा फरकानं कॅग्लिरी क्लबवर विजय मिळवला. मैदानावरील कामगिरीबरोबरच रोनाल्डो त्याच्या फिटनेस आणि फॅशन मुळे नेहमी चर्चेत राहिला आहे.
जगातला सर्वात श्रीमंत फुटबॉलपटू म्हणूनही रोनाल्डो आघाडीवर आहे. त्यामुळे त्याचं रहाणीमानही तसंच आलीशान असायलाच हवं. रोनाल्डोनं नुकतंच एक घड्याळ खरेदी केलं आहे. त्या घड्याळाची किंमत इतकी आहे की मुंबईत एक मोठं घर सहज घेतलं जाऊ शकतं. असं काय आहे या घड्याळात?
34 वर्षीय रोनाल्डो दुबईत आंतरराष्ट्रीय स्पोर्ट्स परिषदेत गेला होता. त्याच्यासोबत प्रेयसी जॉर्जिना रॉड्रीगेजही होती. यावेळी रोनाल्डोच्या हातात एक घड्याळ पाहायला मिळालं आणि त्या घड्याळानं सर्वांचं लक्ष वेधलं.
रोलेक्स कंपनीचं हे घड्याळ होतं आणि त्याची किंमत 485350 अमेरिकन डॉलर म्हणजे जवळपास 3.47 कोटी इतही असल्याचं समजत आहे. हे घड्याळ 18 कॅरेट व्हाइट गोल्ड आणि 30 कॅरेट व्हाइट डायमंड पासून तयार करण्यात आले आहे. या किमतीत मुंबईत एक आलीशान घर खरेदी करू शकाल.