Fifa World Cup, Portugal C. Ronaldo : ख्रिस्तियानो रोनाल्डोचा विश्वविक्रम अन् पोर्तुगालची विजयी सुरूवात; घानाकडून कडवी टक्कर 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 11:32 PM2022-11-24T23:32:10+5:302022-11-25T07:32:53+5:30

Fifa World Cup, Portugal vs Ghana C. Ronaldo : फुटबॉल कारकीर्दित अनेक विक्रम, अनेक चषकं नावावर असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या ( Cristiano Ronaldo) चषकाच्या कपाटात वर्ल्ड कप नाही.

Fifa World Cup, Portugal vs Ghana C. Ronaldo :  Cristiano Ronaldo has become the first player to score five in different editions of the World Cup, Portugal 3-2 Ghana. | Fifa World Cup, Portugal C. Ronaldo : ख्रिस्तियानो रोनाल्डोचा विश्वविक्रम अन् पोर्तुगालची विजयी सुरूवात; घानाकडून कडवी टक्कर 

Fifa World Cup, Portugal C. Ronaldo : ख्रिस्तियानो रोनाल्डोचा विश्वविक्रम अन् पोर्तुगालची विजयी सुरूवात; घानाकडून कडवी टक्कर 

googlenewsNext

Fifa World Cup, Portugal vs Ghana C. Ronaldo : फुटबॉल कारकीर्दित अनेक विक्रम, अनेक चषकं नावावर असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या ( Cristiano Ronaldo) चषकाच्या कपाटात वर्ल्ड कप नाही. रोनाल्डोने या सामन्यात पेनल्टीवर गोल करून विश्वविक्रम नावावर केला. पाच वेगवेगळ्या वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये ( २००६, २०१०, २०१४, २०१८ व २०२२) गोल करणारा  रोनाल्डो हा जगातील पहिला खेळाडू ठरला. त्याने लिओनेल मेस्सी ( ४), मिरोस्लाव्ह क्लोस, पेले व उवे सीलर यांना मागे टाकले.  पोर्तुगालने ३-२ अशा विजयासह वर्ल्ड कपमधील त्यांच्या वाटचालीची सुरुवात केली. 

ख्रिस्तियानो रोनाल्डोचा वर्ल्ड रेकॉर्ड! पेले, मेस्सी यांच्यासह कोणालाच जमला नाही हा पराक्रम, Video

घानाविरुद्धच्या सामन्यात रोनाल्डोने पहिल्या हाफमध्ये लौकिकास साजेसा खेळा केला, परंतु पोर्तुगालला गोल करता आला नाही. ३१ व्या मिनिटाला ख्रिस्तीयानो रोनाल्डोने गोल केला होता, परंतु चेंडू मिळवण्यासाठी त्याने घानाच्या खेळाडूला धक्का दिल्याने रेफरीने तो गोल अमान्य ठरवला. दुसऱ्या हाफमध्ये घानाचा खेळ उंचावलेला पाहायला मिळाला आणि त्यामुळे पोर्तुगालवर दडपण वाढलेले दिसले. ६५व्या मिनिटाला ख्रिस्तियानो रोनाल्डोने सर्वांना गप्प केले... रोनाल्डोला पेनल्टी क्षेत्रात पाडण्याची चूक घानाच्या बचावपटूकडून झाली आणि पोर्तुगालला पेनल्टी मिळाली. हाती आलेली संधी न सोडणे हेच रोनाल्डोने आतापर्यंत दाखवले आहे. त्याने गोल करून पोर्तुगालला १-० अशी आघाडी मिळवून दिली. 

वर्ल्ड कप स्पर्धेत गोल करणारा रोनाल्डो हा दुसरा ( ३७ वर्ष व २९२ दिवस) वयस्कर खेळाडू ठरला. कॅमेरूनच्या रॉजर मिला याने १९९४ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत ४२ वर्ष व ३९ दिवसांचा असताना गोल केला होता. पण, युरोपियन देशांमध्ये गोल करणारा रोनाल्डो वयस्कर खेळाडू ठरला, त्याने स्वीडनच्या ( १९५८ साली) गनर ग्रेन ( ३७ वर्ष व २३६ दिवस) याला मागे टाकले. ७७ व्या मिनिटाला आंद्रे आयेवकडून बरोबरीचा गोल झाला अन् पोर्तुगालच्या ताफ्यात पुन्हा चिंतेचं वातावरण पसरले. पण, पुढच्याच मिनिटाला जोओ फेलिस्कने सुरेख कौशल्य दाखवताना पोर्तुगालला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. पुढच्याच मिनिटाला राफेल लिओने गोल करून पोर्तुगालची आघाडी ३-१ अशी भक्कम केली. 


अखेरच्या पाच मिनिटांत रोनाल्डोला विश्रांती दिली गेली आणि ८९व्या मिनिटाला घानाने संधी साधली. ओस्मान बुकारीने पोर्तुगालची बचावफळी भेदून पिछाडी २-३ अशी कमी केली. आता पोर्तुगालकडून वेळकाढू खेळ होऊ लागला आणि ९ मिनिटांच्या भरपाई वेळेत त्यांन चेंडूवर ताबा राखत आघाडी कायम राखण्याचा प्रयत्न केला. ९०+७ मिनिटाला डिएगो कोस्टाने जवळपास बरोबरीचा गोल केलाच होता, परंतु चेंडू पोस्टवरून गेला. अखेरच्या मिनिटाला पोर्तुगालच्या ताफ्यात गोंधळ पाहायला मिळाला, परंतु घाना बरोबरीचा गोल करू शकला नाही. 
 

Web Title: Fifa World Cup, Portugal vs Ghana C. Ronaldo :  Cristiano Ronaldo has become the first player to score five in different editions of the World Cup, Portugal 3-2 Ghana.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.