शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

FIFA World Cup 2022: स्वित्झर्लंडची विजयी सलामी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 6:48 AM

FIFA World Cup 2022: ब्रील एंबोलो याने केलेल्या सामन्यातील एकमेव गोलच्या जोरावर स्वित्झर्लंडने फिफा फुटबॉल विश्वचषकात ‘जी’ गटातून विजयी सुरुवात करताना कॅमरुनला १-० असे नमवले

अल वाकराह (कतार) : ब्रील एंबोलो याने केलेल्या सामन्यातील एकमेव गोलच्या जोरावर स्वित्झर्लंडने फिफा फुटबॉल विश्वचषकात ‘जी’ गटातून विजयी सुरुवात करताना कॅमरुनला १-० असे नमवले. पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत राहिल्यानंतर दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच एंबोलोने निर्णायक गोल करत स्वित्झर्लंडचा विजय साकारला.स्वित्झर्लंडला विश्वविजेतेपद पटकावण्याची संधी असल्याचे मानले जात असले, तरी कॅमरुनने त्यांना पहिल्या सत्रात चांगलेच  झुंजवले. त्यांनी गोल करण्याच्या काही शानदार संधी निर्माण करत स्वित्झर्लंडला दबावात ठेवले. पहिले सत्र बरोबरीत सुटल्यानंतर मात्र स्वित्झर्लंडने आक्रमक खेळ करत वर्चस्व राखले. दुसऱ्या सत्राच्या तिसऱ्याच मिनिटाला एंबोलोने मिले शेरडन शकीरीकडून मिळालेल्या अप्रतिम पासवर चेंडू गोलजाळ्यात धाडला. या निर्णायक आघाडीनंतर स्वित्झर्लंडने गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या; मात्र त्यांना कॅमरुनचा बचाव भेदता आला नाही. 

s    स्वित्झर्लंडने विश्वचषक स्पर्धेत केवळ दुसऱ्यांदा आफ्रिकन देशाविरुद्ध सामना खेळला.     स्वित्झर्लंड विश्वचषक स्पर्धेत १९६६ नंतर सलग सहाव्या सलामी सामन्यात अपराजित राहिले.     विश्वचषक स्पर्धेत कॅमरुनचा सलग आठवा पराभव.    ब्रील एंबोलोने स्वित्झर्लंडचे प्रतिनिधित्त्व करताना सलग तिसऱ्या सामन्यात गोल केला.     मध्यरक्षक रेमो फ्र्युलरने स्वित्झर्लंडकडून ५०वा आंतरराष्ट्रीय सामना खेळला.

म्हणून गोलचा जल्लोष नाही!सामन्यातील निर्णायक गोल केल्यानंतर एंबोलोने गोल केल्याचा जल्लोष केला नाही. याला कारण म्हणजे त्याने दिलेले वचन. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी एंबोलोने सांगितले होते की, ‘ज्या देशात माझा जन्म झाला आहे, त्या देशाविरुद्ध गोल केला, तर मी आनंद साजरा करणार नाही.’ त्यामुळेच त्याने गोल केल्यानंतर जेव्हा संघ सहकारी त्याच्याकडे आले तेव्हा एंबोलोने स्वत:चा चेहरा हातांनी झाकून घेतला. यानंतर त्याने स्वित्झर्लंड आणि कॅमरुनच्या चाहत्यांना अभिवादन केले. एंबोलो पाच वर्षांचा असतानाच त्याच्या कुटुंबीयांनी कॅमरुन सोडले होते. त्याचे कुटुंबीय आधी फ्रान्स आणि त्यानंतर स्वित्झर्लंडला स्थायिक झाले. 

टॅग्स :Switzerlandस्वित्झर्लंडFifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२