FIFA World Cup 2018: पुन्हा एकदा रोनाल्डो चमकला; पोर्तुगालला 1-0 अशी आघाडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2018 18:34 IST2018-06-20T18:34:24+5:302018-06-20T18:34:24+5:30
एकाच विश्वचषकात चार गोल करणारा तो पोर्तुगालचा गुसरा खेळाडू ठरला आहे.

FIFA World Cup 2018: पुन्हा एकदा रोनाल्डो चमकला; पोर्तुगालला 1-0 अशी आघाडी
मॉस्को : पोर्तुगालच्या दुसऱ्या सामन्यातही बोलबाला राहिला तो ख्रिस्तियानो रोनाल्डोचाच. पहिल्या सामन्यात तीन गोल करत रोनाल्डोने पोर्तुगालला पराभवापासून परावृत्त करत होते. त्यानंतर बुधवारी सुरु असलेल्या दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या सत्रात रोनाल्डोने गोल करत संघाला मोराक्कोविरुद्ध आघाडी मिळवून दिली.
Key stats:
— FIFA World Cup 🏆 (@FIFAWorldCup) June 20, 2018
👉 @Cristiano is the second #POR player to net at least four goals at a single #WorldCup after Eusébio (9) in 1966
👉 @Cristiano is in second place on the all-time international top scorer list behind Ali Daei (109 for Iran)#PORMARpic.twitter.com/IhWxDBcEaA
सामन्याच्या चौथ्याच मिनिटाला पोर्तुगालला पेनेल्टी कॉर्नर मिळाला. या कॉर्नरवर अप्रतिम हेडर लगावत रोनाल्डोने संघासाठी पहिल्या सत्रातील एकमेव गोल केला. रोनाल्डोने एवढ्या शिफातीने हा गोल केला की मोराक्कोच्या खेळाडूंनाही धक्का बसला. एकाच विश्वचषकात चार गोल करणारा तो पोर्तुगालचा गुसरा खेळाडू ठरला आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीतही रोनाल्डो दुसरा खेळाडू ठरला आहे.