शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
4
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
5
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
6
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

FIFA World Cup 2018 : शेजारी-शेजारी भीडणार, पोर्तुगाल आणि स्पेन यांच्याच चुरशीच्या लढतीची अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2018 10:19 PM

एकमेकांविरुद्ध खेळणे नको, असे कदाचित पोर्तुगाल व स्पेन या दोन्ही संघांचे चाहते म्हणत असतील. पण विश्वचषकात दोघेही ‘ब’ या एकाच गटात आले. एवढेच नाही तर स्पर्धेची सुरुवातही दोघांना एकमेकांना भेदून करायची आहे.

ठळक मुद्देजगप्रसिद्ध फुटबॉलपटू आणि ग्लॅमर जगतात नाव असलेला पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तीआनो रोनाल्डोभोवती हा सामना असेल, यात शंका नाही.

चिन्मय काळे : रशिया विश्वचषकातील कदाचित सर्वाधिक लक्षणीय लढत पोर्तुगाल आणि स्पेन या दोन शेजारी देशांच्या संघामध्ये होत आहे. दोघांकडेही स्टारपेक्षाही ‘स्टारडम’ खेळाडूंचा भरणा आणि दोघही विश्वचषकाचे प्रबळ दावेदार यामुळे संपूर्ण फुटबॉल जगताचे या सामन्याकडे लक्ष असेल. एका अत्यंत चुरशीच्या लढतीची अपेक्षा या सामन्याबाबत प्रेक्षकांना आहे.एकमेकांविरुद्ध खेळणे नको, असे कदाचित पोर्तुगाल व स्पेन या दोन्ही संघांचे चाहते म्हणत असतील. पण विश्वचषकात दोघेही ‘ब’ या एकाच गटात आले. एवढेच नाही तर स्पर्धेची सुरुवातही दोघांना एकमेकांना भेदून करायची आहे.

 

 

पोर्तुगाल आणि स्पेन या दोन्ही संघांच्या ताकदीचा विचार केल्यास खरोखर ही लढत तुल्यबळ अशीच आहे. जगप्रसिद्ध फुटबॉलपटू आणि ग्लॅमर जगतात नाव असलेला पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तीआनो रोनाल्डोभोवती हा सामना असेल, यात शंका नाही. रोनाल्डोनेच या सामन्यात पहिला गोल करावा, अशी त्याच्या चाहत्यांची अपेक्षा आहे. त्याच्या जोडीला अनुभवी ब्रोनो आल्व्स, पेपे, जुआओ मॉन्टीन्हो, आंद्रे सिल्व्हा, विल्यम कार्व्हालो या दमदार खेळाडूंची फौज असेल. रोनाल्डो हीच पोर्तुगालची खरी ताकद असेल. त्याखेरीज दोनच वर्षांपूर्वी झालेला युरो कप पोर्तुगालने अनपेक्षितपण जिंकला. त्यामुळे संघाचे मनोबल वाढलेले आहे. फर्नाडो सॅन्तोस हे अनुभवी प्रशिक्षकही संघाच्या दिमतीला आहेत.

याखेरीज काहीशी नकारात्मक स्थिती स्पेनच्या तंबूत आहे. विश्वचषकाच्या तोंडावर १३ जूनला त्यांच्या असोसिएशनने प्रशिक्षकांना घरी पाठवले. त्याजागी तडका-फडकी फर्नांडो हिरेरो यांची नियुक्ती करण्यात आली. याचा स्पेनच्या मनोधैर्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. पण कर्णधार सर्जिओ रेमोस, जेरार्ड पिक्यू, आंद्रेस इनिएस्टा, दिएगो कोस्टा, डेव्हिड सिल्व्हा या २०१० च्या विश्वचषक विजेत्या संघातील अनुभवी खेळाडू संघात आहेत. पण पोर्तुगालच्या रोनाल्डोचा झंझावात स्पेनच्या खेळाडूंना नाकात दम आणू शकतो. रोनाल्डोला रोखता आले तरी स्पेनला अर्धा विजय सोपा होईल, हे नक्की.खास रोनाल्डोला रोखण्याच्यादृष्टीने स्पेन या सामन्यात ४-१-२-२-१ अशा आगळ्या पद्धतीने खेळण्याची शक्यता आहे. पण स्पेनच्या थिअ‍ॅगो, कोस्टा यांना रोखण्यासाठी पोर्तुगालसुद्धा याच पद्धतीची व्युहरचना करण्याच्या प्रयत्नात आहे. बेटींग तज्ज्ञांनी स्पेनलाच झुकते माप दिले आहे. पण एकंदर सामना चुरशीचाच होण्याची दाट शक्यता आहे.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Footballफुटबॉलrussiaरशिया