FIFA Football World Cup 2018 : पहिल्या चार मिनिटांत गोल बरसात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2018 00:27 IST2018-07-02T00:26:52+5:302018-07-02T00:27:19+5:30

विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीच्या सामन्यात आक्रमणाचे अस्त्र घेऊनच मैदानावर उतरलेल्या डेन्मार्क आणि क्रोएशिया या संघांनी पहिल्या चार मिनिटांत गोल धडाका लावला.

FIFA Football World Cup 2018: two goals in first four minutes! | FIFA Football World Cup 2018 : पहिल्या चार मिनिटांत गोल बरसात!

FIFA Football World Cup 2018 : पहिल्या चार मिनिटांत गोल बरसात!

निझनी नोवगोरोड - विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीच्या सामन्यात आक्रमणाचे अस्त्र घेऊनच मैदानावर उतरलेल्या डेन्मार्क आणि क्रोएशिया या संघांनी पहिल्या चार मिनिटांत गोल धडाका लावला. सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला डेन्मार्कच्या मॅथीयास जॉर्गेनसेन याने गोल केला. विश्वचषक स्पर्धा इतिहासात हा दुसरा जलद गोल ठरला. 



डेन्मार्कच्या या गोलला क्रोएशियाकडून चौथ्या मिनिटाला प्रत्युत्तर मिळाले. मारियो मँड्झुकीचने गोल करून क्रोएशियाला बरोबरी मिळवून दिली. 

Web Title: FIFA Football World Cup 2018: two goals in first four minutes!