शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
2
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
3
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
4
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
5
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
6
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
7
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
8
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
9
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
10
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
11
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
12
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
13
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
14
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
15
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
16
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
17
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
18
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
19
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
20
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी

FIFA Football World Cup 2018 : शूटआउट म्हणजे गोलरक्षकांची कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 2:32 AM

शूटआउटमध्ये कॅस्परनेही दोन किक अडविल्या खऱ्या, पण आयव्हन रॅकिटिचने शेवटी त्याला चकवित लढतीचा निकाल लावून टाकला. आता क्रोएशियाची गाठ पडेल ती यजमानांशी! ते पाहुणचार कसा करतील तेही आता त्यांना कळेल!

- रणजीत दळवीशूटआउटमध्ये कॅस्परनेही दोन किक अडविल्या खऱ्या, पण आयव्हन रॅकिटिचने शेवटी त्याला चकवित लढतीचा निकाल लावून टाकला. आता क्रोएशियाची गाठ पडेल ती यजमानांशी! ते पाहुणचार कसा करतील तेही आता त्यांना कळेल! क्रोएशिया व रशिया दोघांनीही अनपेक्षित आगेकूच केली असल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.यजमानांना प्रथमच आपल्या झेंड्याखाली शेवटच्या आठमध्ये प्रवेश मिळाल्याने परमानंद होणे गैर नाही. सोव्हिएत युनियन म्हणून त्यांनी १९६६ साली विश्वचषक स्पर्धेची उपान्त्य फेरी गाठली होती. आणखीन काही वेळा त्यांनी अखेरच्या आठमध्ये मजलही मारली होती. पण या खेळाच्या कट्टर चाहत्यांची घोर निराशा झाली. रशियाची पूर्ण नकारात्मक वृत्ती आणि स्पेनचा ध्येयशून्य खेळ ही नैराश्याची प्रमुख कारणे!रशियाच्या गोलच्या दिशेने दोन तासांच्या एकेरी वाहतुकीअंती त्यांच्या पदरी पडला एक अपघाती गोल. माजी विश्व आणि युरो विजेत्यांकडून हे अपेक्षित होते? त्या ‘टिकीटाका’ने हजारापेक्षा अधिक पासेस निर्माण केले, पण गोलच्या दिशेने जाणारा मार्ग नाही दाखविला. ठीक आहे, आम्ही तुमचा मार्ग अडवणारच ही रशियाची एकमेव नीती होती. पण विश्वातील सर्वोत्तम क्लब आणि मूलभूत सुविधांमुळे संपन्न स्पेनला मार्ग सापडू नये? त्यात अपयश येताच, त्यांनी दूरवरून तोफा डागणे पसंत केले. ना त्या माºयामध्ये ताकद ना दिशा!अगदी शेवटी-शेवटी त्यांनी प्रतिस्पर्धी गोलरक्षक आणि कर्णधार इगॉर अकिनफिव्हची थोडी परीक्षा घेतली. आंद्रे इनिएस्टाचा फटका त्याने रोखताना वेळीच उजवीकडे सूर मारला आणि लगेचच इयागो आसपास याचा प्रयत्न गोलच्या जवळपास येऊ न देण्यात तो यशस्वी ठरला. अकिनफिव्ह जादा वेळेत, शेवटी अडचणीत आला होता. ब्राझीलमध्ये जन्मलेल्या रॉड्रिगोने मोठ्या चलाखीने बचावाला गुंगारा देत वेगवान हल्ला केला. पण कोन अरुंद असल्याने त्याचा फटका रोखणे अकिनफिव्हला शक्य झाले. विशेष म्हणजे, रशियाने संपूर्ण लढतीत केवळ एकदाच प्रतिस्पर्धी गोलवर हल्ला केला, तोही पेनल्टीवर! त्याआधी स्पेनलाही प्रतिस्पर्धी बचावपटू सर्गेई इग्नेशिविचने गोलची भेट प्रदान केली होती. सर्गेईने रॅमोसला रशियन कुस्तीतला डाव लावत त्याने खाली पाडले. पण दुर्दैवाने चेंडू इग्नेशविचच्या पायावर पडला आणि गोलमध्ये गेला. तसे पाहावयास गेले तर रशियन खेळाडू सतत कुस्तीच खेळत होते. एका कॉर्नरदरम्यान त्यांनी पिक, रॅमोस आणि कोके या तिघांना पेनल्टी क्षेत्रात खाली पाडले. पण डच रेफ्री आणि व्हीएआरला हे दिसले नाही. मग शिक्षा सोडा!शूटआउटमध्ये गोलरक्षकांची कसोटी लागते. दोन अव्वल गोलरक्षक म्हटल्यावर संघर्ष! निर्णायक पेनल्टी रोखताना अकिनफिव्हचा मित्र ‘नशीब’ मदतीला धावला. त्याने पडता पडता डावी टांग उचलली व चेंडू दूर गेला. या जोरावर रशियाने स्पेनला चीत केले. त्यामानाने क्रोएशिया - डेन्मार्क सामना बरा होता. डॅनिश गोलरक्षक कॅस्पर श्मायकेलने ल्युका मॉड्रिकची पेनल्टी विफल ठरविल्याने जादा वेळ आणि शूटआउट उद्भवला. सामन्याच्या सुरुवातीला केवळ ५८ सेकंदांत डेन्मार्कच्या मथायस यॉर्गसनने सनसनाटी गोल केला. त्यानंतर क्रोएशियाच्या मारिओ मँडझुकिचलाही गोल करण्यासाठी आयता चेंडू मिळाला. सुबासिच आणि श्मायकेल यांनी शूटआउटमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा केली. सुबासिचने ख्रिस्तियन एरिक्सनची पहिलीच किक अडवत डेन्मार्कवर दबाव आणून आणखीन दोन किक अडवत श्मायकेलला मागे टाकले.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Footballफुटबॉल