शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

FIFA Football World Cup 2018 : फुटबॉलच्या कुंभमेळ्यात भारताच्या दोन 'बिग बीं'चं दर्शन; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 4:26 PM

रशियात सुरू असलेल्या फुटबॉलच्या कुंभमेळ्यात भारताकडून हजारो फुटबॉलप्रेमी दाखल झाले आहेत. बॉलिवूड नायकांना आणि उद्योगपतींनाही फुटबॉलचा मोह आवरता आला नाही. त्यामुळेच ते थेट रशियात दाखल झाले.

मॉस्को - फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा ज्वर संपूर्ण जगभरात दिसत आहे. त्यात आपण भारतीयही कुठे पिछाडीवर नाही. क्रिकेडवेड्या या देशात विश्वचषकाच्या निमित्ताने फुटबॉल प्रेमाचे वारे वाहत आहेत. रशियात सुरू असलेल्या फुटबॉलच्या कुंभमेळ्यात भारताकडून हजारो फुटबॉलप्रेमी दाखल झाले आहेत. बॉलिवूड नायकांना आणि उद्योगपतींनाही फुटबॉलचा मोह आवरता आला नाही. त्यामुळेच ते थेट रशियात दाखल झाले. भारतातल्या अशाच दोन ' बिग बीं'च दर्शन घडले. त्यांच्या उपस्थितीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोण आहेत हे बिग बी चला जाणून घेऊया... कझान येथे खेळवण्यात आलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बेल्जियमने धक्कादायक निकाल नोंदवताना माजी विजेत्या ब्राझील संघाला पराभवाचा धक्का दिला. बेल्जियमने अनपेक्षित निकाल नोंदवताना 2-1 अशा विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश केला. ब्राझिलने अखेरच्या मिनिटाला सोप्या संधी गमावल्याने त्यांना विजय खेचून आणता आला नाही. 2002 नंतर त्यांची जेतेपदाची पाटी कोरीच राहीली आहे. ही लढत याची देही, याची डोळा पाहण्यासाठी रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन हे कझानच्या स्टेडियमवर उपस्थित होते. सामन्याच्या मंध्यंतराला हे दोघेही प्रेक्षकांमधून वाट काढत आपल्या आसनाकडे जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.  पाच वेळा विश्वचषक जिंकणा-या ब्राझील संघाला पाठिंबा देण्यासाठी बच्चन आणि अंबानी कझान स्टेडियमवर उपस्थित होते. पण दुर्दैवाने ब्राझील पराभूत झाल्याने बच्चन यांचा हिरमोड झाला, परंतु दोन्ही संघांतील खेळाडूंचा उत्तम खेळ पाहता आल्याचे समाधान बच्चन यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केले. 

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Amitabh Bachchanअमिताभ बच्चनMukesh Ambaniमुकेश अंबानीFootballफुटबॉलSportsक्रीडा